संस्थानाचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व शिवरामराजे यांच्या कार्यपद्धतीचा माहितीपट लवकरच तयार करणार ! – युवराज लखमराजे भोंसले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे युवराजांनी केले कौतुक.
सावंतवाडी : संस्थानाचे व या शहराची ओळख असलेले ज्यांना ‘रामराज्य’ असेही संबोधले गेले अशा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व पुण्यश्लोक शिवरामराजे महाराज या दोन्ही राजांचे पुतळे गेली अनेक वर्षापूर्वी तलावाच्या काठी नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आला होते. परंतु नगर परिषदेच्या माध्यमातून दोन्ही पुतळ्यांचे मेंटेनन्स न ठेवल्यामुळे दोन्ही पुतळे काहीसे खराब झाले होते. याबाबत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे पूर्वाअध्यक्ष स्व.आबासाहेब परुळेकर यांच्या माध्यमातून निवेदन देखील देण्यात आले होते. पण त्यांच्याकडून कुठच्याही हालचाली न झाल्यामुळे अखेर शेवटी
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व ज्येष्ठ नागरिक यांच्या पुढाकारातून मागच्या वर्षी पुण्यश्लोक शिवरामराजे यांच्या पुतळ्याची डागडूजी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या स्वखर्चातून व काका सावंत माजगाव यांच्या सहकार्याने करण्यात आली होती.
शिवरामराजे यांच्या पुतळ्याभोवती सुशोभीकरण करण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने निवेदने देण्यात आले होते. त्याची दखल घेऊन आज सुशोभीकरण करण्यात आले आहे. परंतु त्यापूर्वीच बापूसाहेब महाराजांचा पुतळा देखील खूपच खराब झाला होता. यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने रवी जाधव यांनी संस्थानचे युवराज लखमराजे यांच्याशी संपर्क साधून पुतळ्याची डागडूजी लवकरात लवकर व्हावी याकरिता लखमराजे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली होती. त्यानंतर लखम राजे यांनी स्वतः तब्बल 35000/ रुपये खर्च करून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या मदतीने बापूसाहेब महाराजांच्या पुतळ्याची माजगाव येथील सुप्रसिद्ध शिल्पकार काका सावंत यांच्याकडून डागडूजी व रंगरंगोटी करून घेऊन महाराजांचा पुतळा पूर्वस्थितीत आणला. तसेच लक्ष्मण कदम यांनी विनामूल्य इतर रंगरंगोटी केली तर व श्रावणी तळवणेकर या विद्यार्थिनी सुबक रांगोळी काढली. त्या दोघांचेही कौतुक युवराज यांनी केले आणि आजच्या या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून गुढीपाडवा व मराठी नव वर्षाच्या दिवशी बापूसाहेब महाराजांच्या पुतळ्यास युवराज लखमराजे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी रवी जाधव यांनी सावंतवाडी नगर परिषदेला सूचित केले की यापुढे तरी सावंतवाडी शहराचा मानबिंदू असलेले पुण्यश्लोक श्रीमंत बापूसाहेब महाराज व शिवरामराजे यांच्या पुतळ्याची देखभाल व्यवस्थित करावी.
यवली पी. आय. अमोल चव्हाण यांनी ‘राम राज्य’ म्हणत बापूसाहेब महाराज यांच्या कार्यपद्धतीचा इतिहास वाचून दाखवला.
याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पी.आय अमोल चव्हाण, देव्या सूर्याजी, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, सुप्रसिद्ध शिल्पकार काका सावंत, काका मांजरेकर, माठेवाडा येथील सुवर्णकार चोडणकर, फोटोग्राफर अनिल भिसे, श्रावणी तळवणेकर, राम वाडकर, दत्तप्रसाद गोठोसकर, सचिन सावंत, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. डॉ. देविदास बोर्डे, प्रा. सचिन देशमुख, प्रा. डॉ. यू. एल. देठे, प्रा. आर. बी. शिंत्रे, प्रा. सी. ए. नाईक, प्रा. डॉ. वाय. ए. चौधरी, प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील, प्रा. आर. के. शेळके, आर. जी . कुराडे, शिवाजी राठोड या सर्व उपस्थितांचे रवी जाधव यांनी आभार मानले.
ADVT –