अहमदाबाद : गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डिसा येथील एका फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. त्यामध्ये, 10 जणांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच डिसा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, येथील एका फटाक्याच्या फॅक्टरीत आग लागल्याची घटना घडली, त्यानंतर कंपनीत एकापाठोपाठ एक स्फोट घडून आले. त्यामध्ये, कंपनीतील काही कामगार अडकले.
बनासकांठाच्या जिल्हाधिकारी मिहीर पटेल यांनीही माहिती देताना म्हटले की, आज सकाळी आम्हाला डिसा येथील औद्योगिक वसाहतीत एका फॅक्टरीत स्फोट झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीच्या दुर्घटनेत कंपनीतील 10 कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही कामगार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्फोटाची दाहकता एवढी भीषण होती की, फॅक्टरीतील भींतीही ढासळल्याचं पाहायला मिळालं.
ADVT –


📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


