गरुड पुराण हे वैष्णव पंथाशी संबंधित एक महान पुराण मानले जाते. हिंदू धर्मात एकूण 18 पुराणांचे वर्णन करण्यात आले आहे. यापैकी एक म्हणजे गरुड पुराण आहे. माणसाच्या कर्मांबद्दल आणि त्या आधारे त्याला मिळणाऱ्या चांगल्या आणि वाईट परिणामांबद्दल या पुराणात सांगितलेलं आहे. या पुराणाचे अधिष्ठाता भगवान विष्णू आहेत. म्हणून हे पुराण वैष्णव पुराण म्हणून देखील ओळखलं जातं. माणसाला त्याच्या आयुष्यात त्याच्या कर्माचे फळ नक्कीच मिळते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ त्याच्या मृत्यूनंतरही मिळते.
याच गरुड पुराणात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामुळे माणसाला आपल्या मृत्यूची चाहूल आधीच लागते. आपला मृत्यू जवळ आला आहे, याची जाणीव माणसाला आधीच व्हायला लागते. याचे संकेत आपल्याला मिळायला लागतात. असे मानले जाते की आत्मा १३ दिवस घरात राहतो. त्यामुळे मृत्यूनंतर १३ दिवस गरुड पुराणाचे पठण केले जाते. तर दुसरीकडे माणसाला आपल्या मृत्यूची चाहूल ही आधीच लागत असते. गरुड पुरणानुसार माणसाला 6 महीने आधीच आपल्या मृत्यूचा अंदाज यायला लागतो. त्याची काही लक्षणसुद्धा आपल्याला दिसतात. मृत्यूपूर्वीच व्यक्तीला संकेत मिळतात. त्यामुळे भविष्यात ओढवणाऱ्या मृत्यूचा अंदाज आपल्याला 6 महीने आधीच लागतो.
- कोणती असतात मृत्यूची चाहूल देणारे 7 संकेत –
– एखादी व्यक्ती स्वतःच्या हाताने त्याच्या नाकाचा पुढचा भाग पाहू शकत नाही. जर एखाद्यासोबत असं घडलं, तर समजून घ्या की त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे.
– जेव्हा पूजा केल्यावर दिवा विझतो तेव्हा त्याचा वास व्यक्तीला येत नसेल, तर समजून घ्या की त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे.
– जर एखाद्या व्यक्तीला दोन्ही कान बोटांनी बंद केल्यानंतर कानात कोणताही आवाज ऐकू येत नसेल, तर असे मानले जाते की लवकरच त्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे.
– एखाद्या व्यक्तीला पाणी आणि तेलात त्याचे प्रतिबिंब दिसणे बंद झाले, तर समजा की जवळजवळ एका महिन्यात मृत्यू जवळ आला आहे.
– तुम्ही घराबाहेर पडताच कुत्रा तुमच्या मागे लागला आणि हे सातत्याने चार दिवसांपेक्षा जास्त काळ चालू राहिले, तर समजून घ्या की मृत्यू तुमच्या जवळ आला आहे.
– गरुड पुराणानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूच्या जवळ येते तेव्हा त्याला यमदूत दिसू लागतात.
– मृत्यू जवळ येताच, हातांवरील रेषा फिकट होतात किंवा कधीकधी त्या अजिबात दिसत नाहीत.
(सूचना – उपलब्ध स्त्रोतानुसार सदर माहिती वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याबद्दल आम्ही कोणताही ठोस दावा करीत नाही.)
ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇



