सावंतवाडी : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती, सावंतवाडी यांनी दरवर्षीप्रमाणे आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या समूह गान भीम गीत स्पर्धेत रमाई कलाविष्कार मडुरा यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर निरवडे महिला समूह द्वितीय आणि सिद्धार्थनगर ग्रुप नेमळे तृतीय ठरला. सदर स्पर्धा रविवारी बॅरिस्टर नाथ सभागृहात उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण 15 संघन सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोकराव दळवी यांच्या हस्ते व शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीच्या अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर होत्या. यावेळी उपाध्यक्ष जगदीश चव्हाण, कवी तथा सांस्कृतिक व साहित्य मंडळाचे सदस्य विठ्ठल कदम, परीक्षक अनिल आचरेकर, महेश तळगावकर, कविता निगुडकर, नरेश कारिवडेकर, पत्रकार मोहन जाधव आदी उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. समितीचे खजिनदार सुनील जाधव यांनी समन्वय समितीच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी अशोक दळवी यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना समन्वय समितीच्या माध्यमातून सर्व संघटना एकत्र येत बाबासाहेब आंबेडकर यांची ही संयुक्तपणे जयंती साजरी करतात, ही बाब निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले. या समाजात अनेक दिग्गज नेते असूनही समाजाच्या एका झेंड्याखाली काम करतात, ही बाब स्तुत्य असून अशा स्पर्धेतून समाजाचे केवळ मनोरंजन न होता प्रबोधनही व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मीनाक्षी तेंडुलकर व विठ्ठल कदम यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी सगुण जाधव यांनी आभार व्यक्त केले.
भीम गीत स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे –
१) प्रथम क्रमांक – रमाई कलाविष्कार मडुरा रुपये 5000/ व स्मृतिचिन्ह रुपये (रश्मी सुशांत चौकेकर पुरस्कृत)
२) द्वितीय – निरवडे महिला समूह निरवडे रु ३०००/- (आनंद कदम पुरस्कृत)
३) तृतीय – सिद्धार्थ नगर ग्रुप, नेमळे रोख रुपये २०००/. (सद्गुरु जाधव व अर्चना जाधव पुरस्कृत.)
उत्तेजनार्थ प्रथम १) पंचशील महिला समूह, सरमळे रुपये 1000/ (अनंत शिवराम कदम पुरस्कृत)
उत्तेजनार्थ द्वितीय २) एकता महिला समूह, मळगाव १०००/ रुपये (अनंत शिवराम कदम पुरस्कृत)
याशिवाय या सर्व पुरस्कार विजेत्या संघास राजेंद्र कृष्णा जाधव यांनी स्मृतिचिन्ह पुरस्कृत केली होती.
या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रियदर्शनी जाधव यांनी केले. या स्पर्धेत खालील संघाने बहारदार भीम गीते सादर केली.
१) निरवडे महिला समूह निरवडे यांनी ‘उघडलाच नाही काळाराम’ २) अनमोल महिला समूह माजगाव यांनी ‘मी वादळ वारा’ ३) सिद्धार्थनगर ग्रुप नेमळे यांनी ‘भीम माझा होता दिलदार’, ४) सावित्रीबाई फुले महिला समूह मळगाव यांनी ‘माझ्या पदी भीमा वाहिली फुले’, ५) रमाई महिला ग्रुप डिंगणे यांनी ‘माझ्या भिमरायाची वाणी’, ६) सूर्य क्रांती महिला समूह नेमुळे यांनी ‘या माझ्या दलित बांधवानो.!’, ७) माता रमाई समूह सांगेली यांनी ‘सोनियाची उगवली सकाळ’, ८)पंचशील महिला सातार्डा यांनी ‘पाहिले चित्र गौतमाचे’, ११) आम्रपाली संघ बांदा यांनी ‘काळाराम मंदिर चवदार तळे’, १२) रमाई कलाविष्कार मडुरा यांनी ‘भीमाने दिले आज संविधान’, १३) रमाई स्वयं महिला समूह सातार्डा यांनी ‘कुंभारी परी’, १४) भिमाची आज्ञा मोडू नका अशा बहारदार गीतांनी नाट्यगृहात भीम विचारांची पेरणी केली.
दरम्यान जिल्ह्यातील आघाडीचा युवा कलाकार राहुल कदम यांनी ‘रमाईची साडी’ हा बहारदार मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातून सुकन्या शशिकांत जाधव (सातार्डा) यांनी ‘रमाईची साडी’ प्राप्त केली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते ही साडी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांता जाधव, लाडू जाधव, अनिल जाधव, केशव जाधव ,विनायक जाधव, तिळाजी जाधव, सद्गुरु जाधव, आदेश जाधव, सुरेश जाधव, शितल जाधव आदींनी विशेष कष्ट घेतले. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण 14 एप्रिल रोजी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
ADVT –



