Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

प्रथमेश सावंतचे एमबीबीएस परीक्षेत सुयश!

सावंतवाडी : शहरातील भटवाडी येथील प्रथमेश सुनील सावंत-भोसले यांनी पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस फर्स्ट क्लासमध्ये पूर्ण केले आहे. पडवे येथील एसएसपीएम कॉलेजमधून ‘एमबीबीएस’ची पहिली बॅच बाहेर पडली असून त्यात सिंधुदुर्गातून प्रथमेश हा एकमेव विद्यार्थी आहे. प्रथमेश हा सावंतवाडी येथील शांतिनिकेतन हायस्कूलचा हुशार विद्यार्थी असून दहावीत त्याला 91 टक्के गुण मिळाले होते. तो दहावीच्या परीक्षेत प्रशालेत पहिला आला होता तर बारावी देखील त्याने 75 टक्के गुण मिळविले होते.

अभ्यासासोबतच त्याला कला आणि क्रीडा, नृत्य व अभिनय याचीही आवड आहे. तसेच Youtube वर त्याने विविध विषयांवर व्हिडिओही तयार केलेले आहेत. तसेच रायफल शूटिंग खेळात तो राज्यस्तरावर चमकला होता. प्रथमेश हा सामाजिक वनीकरण विभाग, कुडाळ येथील वनपाल सुनील सावंत यांचा सुपुत्र तर कलंबिस्त हायस्कूल कलंबिस्त प्रशालेतील कनिष्ठ लिपिक रवीकमल सावंत यांचा भाचा आहे. प्रथमेश सावंत यांच्या यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles