Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

अटल प्रतिष्ठान व जिजाऊ वाचनालयाच्या वतीने विश्वरत्न बाबासाहेबांना विनम्र अभिवादन !

सावंतवाडी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जयंतीचा कार्यक्रम अटल प्रतिष्ठानच्या माठेवाडा येथील प्रशासकीय कार्यालयात जिजाऊ वाचनालय व अटल प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात संपन्न झाला.
यावेळी अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाचे आजच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला. बाबासाहेबांनी देशाला संविधानाच्या रूपाने दिलेला अनमोल दस्तऐवज असून यामुळेच भारताचे सार्वभौमत्व टिकून आहे. वर्षानुवर्षे जातीयतेच्या विळख्यात सापडलेला दलित समाज आज ताठ मानेने मुख्य प्रवाहात वावरत आहे याचे खरे श्रेय भारतरत्न बाबासाहेबांना जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित सर्वानी युगपुरुष बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक दळवी, अटल प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीकांत राऊळ, प्रेरणादायी व्याख्याते प्रा. रूपेश पाटील, अटलच्या विश्वस्त श्रीमती अर्पिता वाटवे, महादेव लिंगवत, समुपदेशक कु. तृप्ती धुरी, कार्यालयीन व्यवस्थापिका कु. ज्योती राऊळ, सौ. तृप्ती पार्सेकर, जिजाऊ वाचनालयाचे विश्वनाथ सनाम, मंगेश राणे आदि मान्यवर उपस्थित होते.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles