संजय पिळणकर.
वेंगुर्ला : आधार फाऊंडेशन सिंधुदुर्ग व माजी विद्यार्थी व हितवर्धक संघ वेंगुर्ला, शाळा नंबर १ यांच्या संयुक्त विद्यमाने व वेंगुर्ला गॅस सर्व्हिस, वेंगुर्ला यांच्या सौजन्याने कै. चंदन मेघश्याम वेंगुर्लेकर यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त वेंगुर्ला शाळा नं. १ प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उदघाटन आधार फाउंडेशन सिंधुदुर्गच्या अध्यक्षा श्रीमती. माधुरी मेघश्याम वेंगुर्लेकर यांच्या हस्ते व डॉ. वंदन वेंगुर्लेकर, ॲड. नंदन वेंगुर्लेकर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, उपाध्यक्ष कमलाकांत सापळे, संजय पिळणकर, सौ. तेजल तारी, सौ. स्नेहल बागडे, सौ. गायत्री मिशाळे, किरण वेंगुर्लेकर, सौ. वैदेही वेंगुर्लेकर, सौ. कावेरी वेंगुर्लेकर, आशिष शिरोडकर, सौ. स्मिता शिरोडकर, सौ. अनिषा देऊलकर, परिचारिका नीलिमा गवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलननाने करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर यांनी तर आभार प्रदर्शन संजय पिळणकर यांनी केले.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


