Monday, November 10, 2025

Buy now

spot_img

चेन्नई सुपर किंग्सला विजयामुळे ‘ऑक्सिजन’ ; लखनौ सुपर जायंट्सला केलं पराभूत !

लखनौ : आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला पुन्हा एकदा विजयाची चव चाखली आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं. मात्र त्यानंतर सलग पाच पराभवांचं तोंड पाहीलं होतं. आता लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून पुन्हा एकदा विजयाची चव चाखली आहे. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 7 गडी गमवून 166 धावा केल्या आणि विजयासाठी 167 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान तसं पाहिलं तर या मैदानावर खूपच कठीण होतं. शाईक रशीद आणि रचिन रविंद्रने चांगली सुरुवात केली. 52 धावांची भागीदारी केली आणि पहिली विकेट गमावली. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि रविंद्र जडेजा काही खास करू खले नाहीत. विजय शंकरची विकेटही झटपट पडली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघावर दडपण वाढलं. पण महेंद्रसिंह धोनी आणि शिवम दुबे या जोडीने विजयश्री खेचून आणला.  महेंद्रसिंह धोनी फलंदाजीला आला तेव्हा 30 चेंडूत 55 धावांची गरज होती. मात्र महेंद्रसिंह धोनी आपला जुना अंदाज दाखवला आणि फिनिशरची भूमिका बजावली.

महेंद्र सिंह धोनी आणि शिवम दुबे यांनी 55 धावांची विजयी भागीदारी केली. यावेळी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 11 चेंडूत नाबाद 26 धावांची खेळी केली. तर शिबम दुबेने संथ पण सावध खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. शिवम दुबने 37 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 43 धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी दिलेलं 167 धावांचं आव्हान 5 गडी गमवून 19.3 षटकात पूर्ण केलं. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या पारड्यात 2 गुणांची कमाई झाली आहे. पण अजूनही गुणतालिकेत तळाशी आहे. प्लेऑफचं गणित सोडवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला 7 पैकी 6 सामन्यात विजय मिळवणं भाग आहे.

लखनौ सुपर जायंट्सकडून ऋषभ पंतने मोठी खेळी केली. एकीकडे एडम मार्करम आणि निकोलस पूरन स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने डाव सावरला. त्याने 49 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 63 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे संघाला 166 धावांपर्यंत मजल मारता आली. मिचेल मार्शने 30, आयुष बदोनीने 22, अब्दुल समदने 20 धावा केल्या. तर शार्दुल ठाकुरने शेवटी येत 4 चेंडूत 6 धावांची खेळी केली.

ADVT –

खुशखबर ..! – आंबोलीत ‘साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबीर’. ; The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीचे संयुक्त आयोजन. ..

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles