Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

राज-उद्धव ‘ठाकरे’ एकत्र येणार का?

मुंबई : ठाकरे कुटुंबातील दोन नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चिन्ह शनिवारी निर्माण झाली होती. राज ठाकरे यांनी युतीसाठी पहिले पाऊल टाकले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्याचे स्पष्टच संकेत दिले. एका मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले, आमच्यामधील भांडणे फार लहान आहे. एकत्र येणे, एकत्र राहणे हे कठीण नाही. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठाच्या कामगार मेळाव्यातून राज ठाकरे यांच्या प्रस्तावास सशर्त प्रतिसाद दिला. भाजप आणि शिंदे सेनेसोबत संबंध तोडण्याची अट उद्धव ठाकरे यांनी घातली. परंतु आता संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्विटनंतर संभ्रम निर्माण झाला आहे.

शनिवारचा दिवस ठाकरे कुटुंबीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा ठरला. राज ठाकरे यांची युतीची तयारी, उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलेला प्रतिसाद, संजय राऊत यांची पत्रकार परिषद त्यानंतर संदीप देशपांडे यांनी मांडलेली वेगळी भूमिका त्यामुळे ठाकरे कुटुंबीय एकत्र येणार का? ही चर्चा सुरु झाली आहे. संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दोन वेळा फसवले असल्याचे म्हटले होते. शिवसेनेने २०१४ आणि २०१७ (मुंबई महापालिका निवडणूक) असा दोन वेळा धोका दिल्याचे संदीप देशपांडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यानंतर रविवारी पुन्हा ट्विट केले आहे.

 काय आहे ट्विटमध्ये…

संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, महाराष्ट्रासाठी एकत्र येणे म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे, असे नाही. मराठी, महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यापुरते सुद्धा एकत्र येता येऊ शकते. जसे तामिळनाडूमध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तामीळ पक्ष एकत्र येतात, तसे मराठी पक्षांनी एकत्र यायला काय हरकत आहे? फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे.

आणखी एका ट्विटमधून ते म्हणतात, तू एवढ्या जागा लढ. मी एवढ्या लढवतो. तू ही जागा लढव. मी ही जागा लढवतो. तुला हे पद, मला हे पद. इतका मर्यादीत विचार करून चालणार नाही. फक्त निवडणूक एवढाच विचार केला तर ती वैचारिक दरिद्रता असेल, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे युतीच्या चर्चा फक्त चर्चाच ठरणार की काय? अशी शक्यता आहे.

ADVT –

खुशखबर ..! – आंबोलीत ‘साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबीर’. ; The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीचे संयुक्त आयोजन. ..

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles