कणकवली: ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून ग्राहक जागृतीचे काम करीत असताना ग्राहकाला केंद्रबिंदू मानून काम केले पाहिजे. शेतकरी, उद्योजक, व्यापारी, श्रमिक आणि ग्राहक हे अर्थव्यवस्थेचे पंचप्राण असून यामध्ये ग्राहक हाच अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून निस्वार्थी आणि सामाजिक भावनेतून ग्राहकाची सेवा करुया, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांनी केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि तालुका शाखा पदाधिकारी यांची विशेष सभा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कक्ष, नगरपंचायत कणकवली येथे जिल्हा अध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर, संघटक श्री. विष्णुप्रसाद दळवी, सचिव श्री.संदेश तुळसणकर, सहसंघटिका रिमा भोसले, सहसचिव सुगंधा देवरुखकर, सल्लागार ॲड.समीर वंजारी व कणकवली शाखा अध्यक्ष श्रध्दा कदम उपस्थित होते.

यावेळी संस्थेची दिनदर्शिका व ओळखपत्रे वाटप, संस्था पदाधिकारी यांच्या जबाबदाऱ्या, जिल्हा व तालुका शाखा यांच्या उपक्रमांचा आढावा,
काही तालुका शाखांची पुनर्रचना करणे, जिल्हास्तरीय एकदिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करणे,
संस्था निधी संकलन करणे. तसेच राज्य कार्यकारिणीच्या सूचनेनुसार शासकीय कार्यालयांना भेटी देणे व महाराष्ट्र शासनाचा १०० दिवसांचा सात कलमी कृति आराखड्याची अंमलबजावणी करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शासकीय कार्यालयांना भेटी देऊन १०० दिवसांचा सात कलमी कृति आराखडा संबंधित प्रश्नावली भरून त्याची प्रत मा.मुख्यमंत्री, मा.मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व नोडल अधिकारी मा. जिल्हाधिकारी व राज्य संस्थेकडे पाठवावी. याकामी सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी संस्थेच्या प्रतिनिधींना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शाखेने केले.
या सभेचे प्रास्ताविक व मनोगत उपाध्यक्ष श्री.सीताराम कुडतरकर यांनी केले. यावेळी संघटक विष्णुप्रसाद दळवी, सल्लागार ॲड.समीर वंजारी यांनी मार्गदर्शन केले.
कणकवली तालुका अध्यक्ष श्रध्दा कदम यांनी गुलाब पुष्प देऊन सर्वांचे स्वागत करुन अभियानाची थोडक्यात माहिती दिली.
या सभेलाॲड. विश्वासराव सावंत, कृष्णा दळवी, विलास चव्हाण, मनोहर पाळयेकर, गीतांजली कामत, राजन भोसले, तेजस साळुंखे, विनायक पाताडे, निलकंठ मालवणकर, आपा मालंडकर, दिपिका मेस्त्री व जनार्दन शेळके आदी प्रतिनिधी उपस्थित होते. शेवटी सचिव श्री.संदेश तुळसकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!


