Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आयुष्य संपवण्यापूर्वी डॉ. वळसंगकरांनी घेतला मोठा निर्णय ! ; मृत्यूपत्राविषयी ‘ती’ माहिती उघड.

सोलापूर : सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी गेल्या आठवड्यात आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळू झाडून घेत आपलं आयुष्य संपवलं. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून एका महिलेचं नाव समोर आलं आहे. मनिषा माने या महिलेने डॉ. वळसंगकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचप्रकरणात आता एक नवी अपडेट समोर आली आहे.

आत्महत्या कारण्यापूर्वी डॉ. वळसंगकर यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात बदल केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी डॉ. वळसंगकर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचा मुलगा अश्विन तसेच सून सोनाली यांचीही चौकशी केली आहे, असे समजते. दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने ही चौकशी करण्यात आली.

आत्महत्या करण्यापूर्वी काही तास आधीच डॉ. वळसंगकर यांनी त्यांचं आयुष्य संपवण्याची तयारी, आत्महत्येची तयारी आधीपासूनच केली होती का असा सवाल आता उपस्थित होत असून पोलिस त्या अनुषंगानेही तपास करत आहेत. दरम्यान शुक्रवारी रात्री राहत्या घरात आत्महत्या करण्यापूर्वीच डॉ. वळसंगकर यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात बदल केला होत, अशी अपडेट समोर आली आहे. पण डॉ. वळसंगकर यांना मृत्युपत्रात बदल का करावासा वाटला?, त्यांनीमृत्यूपत्रामध्ये नेमका काय बदल केला ? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. पण या प्रकरणी सखोल तपास केल्यानंतरच आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू, असे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

मनिषा माने पोलीस कोठडीत –

आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचल असल्याचे डॉक्टरांनी या चिठ्ठीत नमूद केलं होतं. त्या आधारावरच 19 मार्चच्या रात्री पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेतली आणि मनीषा माने हिला अटक केली. त्यानंतर तिला सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयासमोर हजर केले. सदर बझारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यानंतर न्यायलायने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकले आणि मनीषा हिला 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती.

याप्रकरणात मनिषा हिच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत असून डॉक्टरांच्या मृत्यूपत्रातील बदलाबाबतही पोलीस चौकशी करत असल्याचे समजते.

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

खुशखबर ..! – आंबोलीत ‘साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबीर’. ; The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीचे संयुक्त आयोजन. ..

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles