सावंतवाडी : येथील चिमुकला कबीर हेरेकर हा कमालीचा सजग आहे. अनेकदा त्याने पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती यापूर्वीही केली आहे. सध्या उन्हाचा तडाखा जोरदार बसत आहे. आगामी काळात आपल्याला गारवा मिळावा आणि पर्यवरण संतुलित राहावे म्हणून पर्यावरण संरक्षणासाठी कबीरने सावंतवाडीकरांना एक आवाहन केले आहे.
कबीर म्हणतो – “मी कबीर हेरेकर, राहणार सावंतवाडी, आपणास नम्र विनंती करतो की यावर्षी देखील आपण खाल्लेल्या फळांची बिया वाया न घालवता योग्य वापरात आणू. या आपण जमा केलेल्या बिया मला आणून द्या किंवा 7387606444 या क्रमांकावर मला कॉल करा. मी स्वतः येऊन ते गोळा करेल आणि पावसाळा सुरू होतात जंगलात जाऊन पेरेन. ज्याने भविष्यामध्ये त्यांची रोपे तयार होऊन ती वृक्षांची रुपे घेतील आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल. लक्षात ठेवा निसर्ग व पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.
हे माझे बियाणे पेरणी करण्याचे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी 257 व दुसऱ्या वर्षी 303 बियांची मी पेरणी केली होती. यावर्षी मी 500 पेक्षा अधिक बिया पेरण्यासाठी उद्दिष्ट आखले आहे. म्हणून कृपया मला आपल्या सहकार्याची गरज आहे. यानंतर त्याने त्याचा पत्ता देखील नमूद केला आहे.
हेरेकर क्लासेस, निंबाळकर पीर, सालईवाडा, सावंतवाडी
मोबाईल क्रमांक – 7387606444


