सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे देऊळवाडी सातेरी मंदिराच्या पाठीमागील रेल्वे ब्रिजच्या खालून तळवडेवरून नेमळेत आलेल्या मुख्य विद्युत लाईनच्या पोलवर दाट वेली तसेच झाडी वाढल्यामुळे या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन तारा तुटण्याची किंवा पुन्हा एकदा ट्रान्सफॉर्मर जळण्याची शक्यता आहे या ब्रिजच्या खालून देऊळ वाडी येथील शेतकरी रेल्वे रुळाच्या पलीकडे आपल्या शेतात रोज ये – जा करतात याच पोलच्या खाली देऊळवाडी येथील एका शेतकऱ्याचा बैल शॉक लागून मृत्यू मुखी पडला होता. आताही या ताराखालून शेतकऱ्याची राहादारी चालू असल्यामुळे याठिकाणी केव्हाहीं शॉर्ट सर्किट होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे याला विद्युत वितरण कंपनी जबाबदार राहणार आहे वारंवार सांगूनही याकडे कर्मचारी आणि अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत लवकरात लवकर हीं वाढलेली झाडी वेली तोडून विद्युत वाहिन्या सुरक्षित कराव्यात अशी मागणी नेमळे ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे
‘त्या’ मुख्य विद्युत लाईनच्या पोलवर वाढलेल्या झाडं-वेली तात्काळ काढा.! ; नेमळेवासियांची मागणी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


