वेंगुर्ला : येथील येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील शाखा व्यवस्थापक पदावर असलेल्या मराठी द्वेषी तसेच हिंदी भाषिक असलेल्या एका उन्मत्त कर्मचाऱ्याच्या विरुद्ध सामाजिक कार्यकर्ते ॲड. नंदन वेंगुर्लेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणीच्या ठरलेल्या गोष्टींचा पाढा त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांकडे सादर केले असून यात त्यांनी या मराठी द्वेषी कर्मचाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर निवेदनात श्री. वेंगुर्लेकर म्हणतात की,
महाशय,
आम्ही वेंगुर्ला गॅस सर्व्हिस, वेंगुर्ला आपल्या बँक ऑफ इंडिया, वेंगुर्ला शाखेचे अधिकृत खातेदार असून आमचा चालू खाते क्रमांक १४१५२०११००००१६७ असा आहे. तसेच आमचे दुसरे चालू खाते क्रमांक १४१५२०११००००१७९ आधार फाऊंडेशन, चेंगुर्ला या नावाने दिनांक ३०/०४/२०२४ पासून आहे.
मागील २ वर्षामध्ये आपल्या शाखेतील शाखा व्यवस्थापक व कर्मचारी यांच्याकडून आम्हाला अतिशय वाईट, गलिच्छ व हिन दर्जाची वागणूक मिळत असून वेळोवेळी तोंडी तक्रार करूनही अद्यापही आपल्या वेंगुर्ला शाखेच्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही, ही अतिशय दुर्देव्याची गंभीर बाच आहे.
चुकीच्या माणसांमुळे बँक ऑफ इंडियाच्या नावलौकीक व प्रतिष्ठेला बाधा येत असून बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर अधिकृत जाहीर केलेल्या मिशन, दृष्टी व धोरणाच्या विरूध्द सदरील उद्दाम कर्मचारी वागत असून किफायतशीर व प्रतिसादात्मक सेवा प्रदान करताना वेंगुर्ला शहर तसेच तालुक्यातील असंख्य ग्राहकांना अडचणी निर्माण होत आहेत. आपल्या माहितीकरीता सध्या होत असलेल्या अडचणी, समस्या व प्रलंबित मागण्या खालील प्रमाणे नमुद करीत आहे.
१) सदरील बँक भारत सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने RBI च्या निर्देशानुसार कार्यालयाच्या प्रथमदर्शनी भागात किंवा नोटीस बोर्डवर सर्व ग्राहकांसाठी “नागरीकांची सनद” म्हणजेच “सिटीझन चार्टर” ची खरी प्रत आजमितीपर्यंत लावण्यात आलेली नाही. सदरील बाब अतिशय गंभीर असून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बेजबाबदार शाखा व्यवस्थापकास तात्काळ निलंबीत करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आम्ही करीत आहोत.
२) बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने ठरविलेल्या निर्णयानुसार प्रत्येक शाखेत सर्व वरीष्ठ अधिकारी/ ग्राहक सेवा केंद्र/ CVO/ इतर तत्सम उच्चस्तरीय अधिकारी यांचे नाव, पदनाम, पत्ता संपर्क क्रमांक, ईमेल आयडी प्रथमदर्शनी भागात किंवा नोटीस बोर्डवर लिहिणे. RBI च्या निर्देशानुसार बंधनकारक व क्रमप्राप्त असूनही केवळ विकृत मानसिकतेमुळे आजपर्यंत संबंधित निष्क्रिय शाखा व्यवस्थापकाने कामातील अनियमीततेमुळे आजपर्यंत पूर्ण केलेले नाही. सदरील बाब अतिशय गंभीर असून वरील कर्मचाऱ्याने जबाबदारीचे पालन न केल्यामुळे अशा कार्यक्षम शाखा व्यवस्थापकास तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी प्रखर मागणी आम्ही करीत आहोत.
३) बँक ऑफ इंडियाची अधिकृत शाखा असलेल्या वेंगुर्ला शाखेत चांगल्या स्वच्छतेची कमतरता असून शाखेच्या आवारात काही ठिकाणी केर-कचरा, खराब कागद व घाणीचे साम्राज्य साचलेले असून ग्राहकांना नाक मुठीत धरून व इतरत्र पडलेल्या धुळीत नाईलाजाने स्वतःचे काम पूर्ण होईपर्यंत बसावे लागते. सदरील बाब भारत सरकारच्या स्वच्छता अभियानाच्या विरुध्द असून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. अलाहिदा सदरील अस्वच्छ कर्मचान्याचे (BM) तात्काळ निलंचन करावे अशी आर्जव मागणी आम्ही करीत आहोत.
४. शासनमान्य बँक ऑफ इंडिया, वेंगुर्ला शाखेत वैयक्तिक कामासाठी दाखल झालेल्या महिला/पुरुष/ लहान मुले/ जेष्ठ नागरीक यांना पुरेशा स्वच्छ व निर्मळ पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा नसून वारंवार पाण्याची कमतरता अधिकृत ग्राहकांना भर उन्हातून आल्यावर जाणवत आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही प्रत्येक राष्ट्रीय बँकेची संविधानातील तरतुदीनुसार प्रमुख जबाबदारी असून यामध्येही सदरील उद्दाम कर्मचारी (BM) कमी पडत असून म्हणून त्याचे तात्काळ निलंबन करणे अनिवार्य आहे अशी रितसर मागणी आम्ही करीत आहोत.
५. भारत सरकार व वित्त मंत्रालय, नयी दिल्ली व RBI च्या प्रमुख निर्देशानुसार प्रत्येक बँकेत जेष्ठ नागरीक व दिव्यांगासाठी स्वःतंत्र कक्ष व स्वतंत्र लाईन कायदेशीररित्या असलीच पाहीजे अश्या कडक मार्गदर्शक सुचना असूनही सदरील शाखा व्यवस्थापकाने जेष्ठ नागरीक व दिव्यांगासाठी आजपर्यंत अशी कोणतीही सोय केलेली दिसून येत नाही. विचित्र मानसिक रोगाने पछाडलेल्या या कर्मचाऱ्याने वेंगुर्लातील जेष्ठ नागरीक व दिव्यांगांना जाणीवपूर्वक आर्थिक / मानसिक / शारिरीक त्रास देण्याचे आजही चालू ठेवले असून यावरून सदर व्यक्ती किती कोटया वृत्तीची आहे याचा उमग येतो. शुल्लक कामासाठी पुन्हा बँकेत यावे लागू नये यासाठी कोणतीही व्यक्ती लेखी तक्रार करण्याचे धाडस करीत नसून निमुटपणे, नाईलाजाने प्रत्येक ग्राहक सहन करीत आहेत. अशा हुकुमशाहीला आळा घालण्यासाठी सदरील विक्षिप्त कर्मचाऱ्यास (BIM) अधिक वेळ फुकट न घालयता कमीत कमी कालावधीमध्ये तातडीने निलंधित करावे अशी आग्रही मागणी आम्ही करीत आहोत.
६. सिंधुदुर्ग जिल्हयाची अग्रणी बँकक अशी बिरुदावली असलेल्या बँक ऑफ इंडिया, वेंगुर्ला शाखेत वैयक्तिक कामासाठी आलेल्या महीला हया सुरक्षित नाहीत असा वाईट अनुभव स्थानिक महिलांना सतत येत आहे. सदरील स्त्रीलंपट कर्मचाऱ्याकडून (BM) महिलांना मुद्दाम छोटया छोटया कामासाठी ताटकळत बसवून प उभे करून ठेवणे, त्यांच्याकडे वाईट नजरेने बघुन त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे किळसवाणे कृत्य करणे, महिला बचत गटाचा समुह आल्यास जाणीवपूर्वक निवडक महिलांना केबिनमध्ये बोलावून घेऊन अवांतर विषयांवर चर्चा करायला भाग पाहणे असे मानहानीकारक प्रकार सतत चेंगुर्ला शाखेत होत आहे. प्रत्येक महिला स्वतःची इज्जत व इभ्रत चारचौघात खराब होऊ नये तसेच स्वतःच्या आत्मसन्मानाला धक्का लागू नये, यासाठी कोणतीही महिला लेखी किंवा तोंडी तक्रार करण्यास पजावत नाही. याचाच गैरफायदा घेऊन सदर महिलांचे शांत व कपटी वृत्तीने मानसिक शोषण करून त्यांना वारंवार वेठीस धरले जात आहे. हा प्रकार प्रचंड वेदनादायी असून लवकरच राज्य महिला आयोग, मुंबई यांचेकडे रितसर /कायदेशीर तक्रार काही महिला वर्ग देण्याच्या तयारीत आहे. सदरील बाब अतिशय घाणेरडी व विकृत प्रवृत्तीचे भयाण दर्शन घडवणारी असून सदरील कर्मचाऱ्याचा (BM) कोणताही मुलाहीजा न ठेवता का निलंबन करावे, अशी आर्त मागणी आम्ही करीत आहोत.
तरी वरील सर्व गंभीर तक्रारीची तातडीने दखल घेऊन आपल्या संचालक मंडळाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हयातील या बेजाबदार कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करावे आणि वेंगुर्लातील तमाम जनतेला व सभ्य ग्राहकांना त्यांच्या जाचातून मुक्त करावे, अशी आग्रही मागणी पुन्हा करीत आहोत, असे ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
ADVT –


