सावंतवाडी : तब्बल सहा महिन्यांपासून अधिक काळ उभ्या असलेल्या १५ ते २० रुग्णवाहिकांच्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त सापडला आहे. ‘युवकांचे जीव जाताहेत, ‘ॲम्बुलन्स’ मात्र सडताहेत !’ अशा आशयाची बातमी सत्यार्थ न्यूजने प्रसारित केल्यानंतर आता तात्काळ उद्या 1 मे रोजी या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात करण्यात योजिले असल्याचे बॅनर सावंतवाडी शहरात लागले आहेत.
मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात आलेल्या या रुग्णवाहिका एवढे दिवस अचानक गायब झाल्या आणि आता उद्या त्या विविध सामाजिक संस्थांना वितरित करणार असल्याचे बॅनर सावंतवाडी शहरात झडकले आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे चौथ्यांदा आमदारकी भूषवित असलेले राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचा लोकार्पण उद्या महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर केले जाणार आहे.


