Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

सागरी मंडळाचे प्रकल्प, बंदरे, जेट्टी, मत्स्य व्यवसायात अवैध बांगलादेशी, पाकिस्तानी आढळले तर कसून चौकशी करा.! : मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचे कडक निर्देश.

मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सागरी मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये तसेच बंदरे, जेट्टी आणि मत्स्य व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जागांमध्ये काम करणारे कामगार तसेच या जागेत वावर असणाऱ्या सर्व व्यक्तींची सागरी सुरक्षा दलाने आणि महाराष्ट्र पोलिसांनी कसून चौकशी करावी असे निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. आज सागरी सुरक्षे बाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी निर्देश दिले.

काश्मीर पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सागरी सुरक्षेबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्राला विस्तीर्ण असा 720 किलोमीटरचा समुद्र किनारपट्टी लाभली आहे. त्यावरील सर्व बंदरे, मच्छ व्यवसाय प्रकल्प वर सुरक्षा संदर्भात पावले उचलावित असे निर्देश वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना मंत्री नितेश राणे यांनी दिले.
तसेच काश्मीर येथील आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत सागरी सुरक्षा पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाकडून कोणत्या प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना आढावा घेतला.

सागरी सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक आणि सजग राहण्यासाठी सर्च ऑपरेशन, कोंबिंग ऑपरेशन राबवून कामगारांच्या ओळखपत्रांची तपासणी, आधार कार्डची तपासणी इत्यादी चौकशा करण्याची सूचना देखील त्यांनी यावेळी केली.
यामध्ये विशेषतः ससून डॉक क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी, बोट चालक, फेअरीवाले तसेच तिथे काम करणाऱ्या सर्व व्यक्तींची चौकशी आणि तपासणी करण्याचे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.

बंदरे आणि समुद्र किनारपट्टीवर काम करणाऱ्य सर्व कामगारांना पोलीस पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्याची सूचना देखील मंत्र्यांनी यावेळी केली. सर्व कामगारांनी ओळखपत्र बाळगावे सर्व व्यक्तींची चौकशी करण्याबाबत तात्काळ नोटीसा संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात याव्यात.

महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग तसेच गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा फेरी कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध बांगलादेशी नागरिक काम करत असल्याबाबतची माहिती असल्याने हा परिसर संवेदनशील आहे. त्या
मुळे सागरी सुरक्षा पोलीस महानिरीक्षक तसेच कोकण विभाग पोलीस महानिरीक्षक आणि महाराष्ट्र सागरी मंडळाने सर्वांची चौकशी आणि तपासणी करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
सागरी सुरक्षा बाबत आढावा बैठक विसीद्वारे आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप , राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक श्री. दराडे, सागरी सुरक्षा पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत तसेच मुंबई पोर्ट झोनचे पोलीस उपायुक्त या बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते.

ADVT –

 

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles