कणकवली : कणकवली कॉलेज अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष,रसायनशास्त्र विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने गृहोपयोगी रसायन निर्मिती या विषयावर दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळत महाविद्यालयात एक दिवसीय प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाणे करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या चेअरमन मा. डॉ. राजश्री साळुंखे मॅडम, प्राचार्य युवराज महालिंगे, प्रशिक्षक डॉ. किशोर गायकवाड व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.शामराव दिसले, करिअर कट्टा समन्वयक डॉ. बाळू राठोड, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक प्रा. महादेव माने सर, प्रा. डॉ. किरण जगताप मान्यवर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी दैनंदिन जीवनातील वापरल्या जाणाऱ्या रसायनाचे महत्त्व उदाहरणासह स्पष्ट केले. घरगुती गुणवत्तापूर्वक केमिकल निर्मिती, त्यासाठी पाठ्यपुस्तकातील संकल्पना व त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करता येईल याचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमुळे मुलांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण होऊन, उद्योजकता वाढीस लागण्यास निश्चितपणे मदत होईल असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शामराव दिसले यांनी केले. कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक डॉ. किशोर गायकवाड यांनी आपण किती सोप्या पद्धतीने फिनाईल, डिटर्जंट, लिक्विड सोप आणी निळ कशी तयार करू शकतो ते स्पष्ट केले. प्राचार्य युवराज महालिंगे सर यांनी मनोगत व्यक्त केले व या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किरण जगताप व आभार प्रदर्शन डॉ. सुरेश हुसे यांनी केले. या कार्यशाळेच्या नियोजनामध्ये प्रा. सुरेश पाटील प्रा. गीतांजली सापळे, प्रा. अविनाश पोरे, प्रा. हेमंत गावित, प्रा. निलेश खुटाळे , प्रा. कपिल गडेकर, लॅब असिस्टंट श्री गुरुनाथ सावंत, श्री समीर तावडे, श्री सचिन भगत, श्री रवींद्र लाड,श्री प्रमोद चव्हाण व मंगेश भोगले यांचे सहकार्य लाभले. या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये 60 प्रशिक्षणार्थींनी निळ, डिटर्जंट पावडर, फिनाईल व साबण अशी विविध गृहोपयोगी उत्पादने स्वतः तयार केली. या कार्यशाळेचा समारोप सहभागी विदयार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करून करण्यात आला.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


