नवी दिल्ली : भारताकडून सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर आणि सिंधू नदीचं पाणी अडवल्यानंतर पाकिस्तान गुडघ्यावर बसल्याचे पाहायला मिळत आहे. सिंधू जल करारासंदर्भात पुन्हा एकदा विचार करा, असं म्हणत भारताला पाकिस्तानकडून एक पत्र पाठवण्यात आलं आहे. यामध्ये तहानलेल्या पाकिस्तानकडून भारताला विनंती करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सैय्यद अली मुर्तुजा यांनी भारताच्या जलशक्ती मंत्रालयांच्या सचिवांना हे विनंती करणारं पत्र पाठवलं आहे. दरम्यान, भारताने पाणी अडवल्याने पाकिस्तानात जलसंकट निर्माण झालं आहे. त्यामुळे भारताने सिंधू जल करारासंदर्भात पुनर्विचार करावा, अशी विनवणी पाकिस्तानकडून भारताला कऱण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा देत रक्त आणि नदी कोणत्याही परिस्थितीमध्ये एकत्र वाहू शकत नाही, असं म्हटलं होतं.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले ! ; भारताला थेट पत्र, केली ‘ही’ एकच विनंती.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


