Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

ताज हॉटेल इंडस्ट्रीजने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी गुंतवणूक करावी यासाठी मंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न. ; पालकमंत्री नितेश राणे यांनी ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतली मंत्रालयात बैठक.

– सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताजने प्रकल्प उभारावा सर्वतोपरी मदत करू, मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन.

– ताज हॉटेल इंडस्ट्रीजमुळे सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकासात्मक उंचीवर जाईल.

मुंबई – कणकवली :  जगभरात नावलौकिक असलेल्या ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प उभारावा यासाठी सिंधुदुर्ग चे पालकमंत्री म्हणून नितेश राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा ,स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकर्षित व्हावेत, यासाठी पालकमंत्री नितेश राणे हे नवनवीन उपक्रम हाती घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ताज हॉटेलच्या मॅनेजमेंट सोबत बैठक करून त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॉटेल प्रकल्प उभारण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
ताज प्रोजेक्टच्या माध्यमातून सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जावी यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत. नुकतीच ताज हॉटेल्स अँड हॉस्पिटॅलिटी चे एमडी पुनीत चटवाल आणि कार्यकारी उपाध्यक्ष बीजल देसाई यांच्या सोबत मंत्री नितेश राणे यांनी मुंबईत मंत्रालयातील आपल्या दालनात बैठक घेऊन चर्चा केली. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासात्मक उंचीवर नेण्यासाठी पर्यटन क्षेत्रात विश्वासार्हता असलेल्या ताज हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटी ने जिल्ह्याचा पार्टनर म्हणून पर्यटन क्षेत्रात काम करावे आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करू असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासा संदर्भात चर्चा करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे त्याला विकसित करण्याबाबत काय करावे लागेल या विषयी सविस्थत चर्चा झाली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles