Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ अव्वल.! ; वालावलचे जैन महालक्ष्मी भजन मंडळ द्वितीय. ; सरमळे सातेरी भगवती कला क्रीडा मंडळाचे आयोजन.

सावंतवाडी : सरमळे येथील श्री देवी सातेरी भगवती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूर येथील मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत वालावलच्या जैन महालक्ष्मी प्रासादीक भजन मंडळाने द्वितीय क्रमांक तर ओटवणेच्या श्री रवळनाथ नवतरुण प्रासादीक भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला.

भजन स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे –

उत्तेजनार्थ प्रथम – चिंतामणी प्रासादीक भजन मंडळ (वायंगणी), द्वितीय – कलेश्वर पूर्वी प्रासादीक भजन मंडळ (वेत्ये), तृतीय – श्री देवी भावई प्रासादीक भजन मंडळ (झाराप), उत्कृष्ट गायक – कु अनिकेत भगत, उत्कृष्ट पखवाज – कु प्रणव मेस्त्री, उत्कृष्ट तबला – कु प्राजक्ता परब, उत्कृष्ट हार्मोनियम – कु गौरेश परब, उत्कृष्ट चकवी वादक – कु नवनीत मठकर, उत्कृष्ट कोरस – स्वरंगीत प्रासादीक भजन मंडळ, (हरिचरणगिरी),
शिस्तबद्ध संघ – श्री देव मूळपुरुष प्रासादीक भजन मंडळ (सरमळे)
यावेळी भजन स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १०००० रुपये, ७००० रुपये, ५००० रुपये, उत्तेजनार्थ प्रथम आणि द्वितीय प्रत्येकी १००० रुपये, तसेच उत्कृष्ट गायक, तबलावादक, पखवाज वादक, हार्मोनियम आणि चकवी वादक, आणि शिस्तबद्ध संघ प्रत्येकी १००० रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ग्रामदैवत सातेरी भगवती मंदिर येथे घेण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध भजनी बुवा प्रकाश चिले आणि महेंद्र पिंगुळकर यांनी काम पाहिले. या भजन स्पर्धेत जिल्ह्यातील १२ भजन मंडळानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी प्रथम तीन पारितोषिक कु स्वामी एकनाथ दळवी, कु शौर्य शिवांकर गावडे, मंडळाचे उपाध्यक्ष शिवांकर गावडे यांनी पुरस्कृत केली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बुवा समीर गावडे यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles