वेंगुर्ले : तालुक्यातील आसोली (कुकेरखिंड) येथील रस्त्याच्या कडेला असलेला विद्युत पुरवठा करणारा सिमेंट पोल कधीही जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत असून या रस्त्यावरून येथील ग्रामस्थ,पादचारी वाहनचालक यांची सतत ये -जा असते. सध्या पावसाचे प्रमाण जोरदार सुरू असून,यामुळे सगळीकडे पडझड सुरू झाली आहे.त्यात करून हा विजेचा पोल कधीही कोसळण्याच्या स्थितीत असून ,एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे संबंधित विभागाने या बाबत योग्य ती उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी होत आहे.

त्यात करून या वाडीतून जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू असून ते अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जिकीरीचेच आहे. रस्त्यावर माती,चिखल आल्याने रस्ता निसरडा बनला आहे त्यामुळे वाहन चालवताना मोठी कसरतच करावी लागत आहे. त्यामुळे वाहन घसरून एखादी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर याबत योग्य ती उपाययोजना करावी व पुढील होणारी दुर्घटना टाळावी हीच सर्वसाधारण नागरिकांची अपेक्षा.


