मुंबई : मुंबईत आजही ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. काल विश्रांती घेतल्यानंतर आज मुंबईच्या आकाशात मळभ साचलंय. तर मुंबईत जरी पाऊस नसला तरी गार वारा सुटलाय. मंबईतील कुर्ला, चेंबूर, बांद्रा या भागात पावसाची रिपरिप पाहायला मिळतेय. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस राज्यातील समुद्र खवळणार असल्यानं किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. शहरात पुढील 24 तासांमध्ये आकाश ढगाळ राहील, तर उपनगरीय भागांमध्ये अधूमधून पावसाच्या सरींची हजेरी आणि मेघगर्जनाही पाहायला मिळेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
सावधान ! – राज्यातील समुद्र खवळणार, किनारपट्टी भागांना धोका.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


