Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

भटवाडीच्या रस्त्यामधील खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण ! ; नागरिक झालेत हैरान !

सावंतवाडी : येथील भटवाडी परिसर पूर्णपणे दुर्लक्षित भाग बनला आहे. गटार व रस्त्याची कामे अपूर्ण आहेतच, त्यात अजून रस्त्यामध्ये नळ कनेक्शनसाठी खोदाई करून ठेकेदार त्या खड्ड्यांवर फक्त माती ओढून निघून जातात. जर जाब विचारल्यास ‘आपण खड्डे खोदायचे नगरपरिषदेमध्ये पैसे भरले आहेत. त्यामुळे तुम्ही नगरपरिषदला जाऊन विचारा, आमचा काही संबंध नाही !’ असे स्पष्टपणे सांगत आहेत. सदर परिस्थिती सावंतवाडी शहरातील काही वार्डमध्ये अशीच आहे. त्यामुळे सध्याची गंभीर परिस्थिती अपघाताला निमंत्रण देणारी ठरणार आहे.
यासाठी नगरपरिषदेने लवकरात लवकर कार्यवाही करून येथील नागरिकांना सहकार्य करावे, यासाठी
येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांना विनंती करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles