सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे येथील श्री देवी सातेरी पंचायतनाचा पुनः प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि 3 जून ते बुधवार दि 4 जून 2025 या कालावधीत संपन्न होत आहे. या निमित्ताने श्री देवी सातेरी मंदिरामध्ये चंडियाग सोहळा संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्यास सर्व भाविक भक्त, देणगीदार, पाहुणे मंडळी, शिमधडे सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याच्या कृपा प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रमुख गावकर मंडळी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रम पत्रिका –
मंगळवार दि 3 जून –
सकाळी 7ते 11 शांती पाठ, देवतांची प्रार्थना,गणपती पूजन, आचार्य वरण, प्रकार शुद्धी देवता, स्थापना,चंडिपाठ, ग्रहयाग आरती तीर्थप्रसाद,
सायं 6 वाजल्यापासून भजनाचा कार्यक्रम.
रात्रौ 9.30 वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे (देवेंद्र नाईक प्रस्तुत) दशावतारी नाटक.
बुधवार दि 4 जून –
सकाळी 7 ते 12 –
आवाहीत देवता पूजन,सहस्र दल कमलपुष्प पूजा,कुकुमार्चन चंदीपाठाचे हवन बलिदान पूर्णाहुती आरती महागाऱ्हाणे,तीर्थप्रसाद, महाप्रसाद,
सायं 6वा -भजनाचा कार्यक्रम
रात्रौ 10 वा. जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचे नाटक.
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!


