सावंतवाडी : तालुक्यातील पाडलोस ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत पाडलोस व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सरपंच श्रीमती सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजेश शेटकर व्यासपीठावर उपस्थित होते.

नैसर्गिक शेती तज्ज्ञ मार्गदर्शक मिलिंद निकम यांनी नैसर्गिक शेतीची उपयुक्तता व याकरिता लागणाऱ्या निविष्ठा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. देशी जनावरे बाळगणे बाबत आवाहन केले. कृषी पर्यवेक्षक श्री. सरगुरु यांनी कृषी विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले व लागवडीच्या योजनांचा लाभ घेणेबाबत आवाहन केले. ग्रामसेवक श्रीमती आळवे व कृषी सहाय्यक श्री. नन्नवरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कृषी सखी श्रीमती स्नेहा कुबल व श्रीमती नेहा नाईक यांनी कार्यक्रमाकरिता मेहनत घेतली.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


