बांदा : इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर सोमवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत 51 हजार 840 रुपयांची दारू व पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात अलिबाग येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची बांदा पोलिसांकडून तपासणी सुरू होती. दरम्यान गोव्यातून बेकायदा होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूसह एक टेम्पो तपासणी नाक्यावर आला. यावेळी सदर टेम्पोची तपासणी करण्यासाठी थांबविण्यात आला. यावेळी वाहनामध्ये गोवा बनावटीचा 51 हजार 840 रुपयांचा दारूसाठा आढळला. सदर वाहतूक बेकायदा असल्यामुळे पाच लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले. याप्रकरणी निहाल नैनुद्दिन हळदे (अलिबाग) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई सोमवारी मध्यरात्री करण्यात आली असून अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.
इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर अवैध दारूसह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


