Sunday, June 22, 2025

Buy now

spot_img

दुर्लक्षित असलेल्या म्हाराठी बेरडकीवाडीला अखेर मिळाला रस्ता ! ; भाजपाचे युवा नेते संदीप गावडे यांच्या अथक प्रयत्नांना मिळाले यश.

सावंतवाडी : तालुक्यातील चौकुळ येथील म्हाराठी बेरडकीवाडी म्हणजे स्वातंत्र्यानंतरही प्रचंड दुर्लक्षित असलेले वाडी. बेरड समाजातील बांधवांची वस्ती असलेल्या या वाडीकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. मात्र भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप गावडे यांच्या दूरदृष्टीने बेरडकीवासीयांना समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. गेली कित्येक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे संदीप गावडे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न झाले. या बहुप्रतीक्षित रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. यामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून, दळणवळणाची सोय मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे.

यावेळी भाजप युवा नेते संदीप गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यांच्यासोबत चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, बूथ अध्यक्ष संतोष गावडे, बूथ अध्यक्ष सोमा गावडे, चौकुळ विकास सोसायटीचे चेअरमन पी. डी. गावडे, दयानंद गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे आणि अनिकेत आसोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप गावडे म्हणाले, “या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार असून, विकासाला गती मिळेल,” असे सांगितले. तसेच, ”या रस्त्याच्या कामामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, यामुळे परिसरातील शेतीमाल वाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याची सोय अधिक सुकर होईल”, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles