Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

तीन लग्नं झाली, चौथ्याची तयारी, सासूला संशय येताच बाथरुममध्ये गेली अन्…

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहा चौधरी नावाच्या एका महिलेने तीन पुरुषांशी लग्न केलं आणि नंतर तिच्या सासूची हत्या केली. ती चौथ्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होती. सासूला याची खबर लागली होती, म्हणून सुनने तिला मार्गातून कायमची हटवली. ही घटना इंदूरच्या विजयनगर परिसरात घडली. पोलिसांनी नेहाला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

विजयनगर परिसरात नेहा चौधरीबाबत अनेक खुलासे झाले आहेत. नेहाने सर्वप्रथम नर्मदापुरम जिल्ह्यातील नरसिंहपूर येथील बृजेश पटेल यांच्याशी लग्न केलं होतं. या लग्नापासून तिला एक मुलगा आहे. काही काळानंतर त्यांचे संबंध बिघडले आणि त्यांचा घटस्फोट झाला. मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहू लागला.

मुंबईत लिव्ह-इनमध्ये राहिली –

घटस्फोटानंतर नेहा मुंबईला गेली. तिथे ती रोहित नावाच्या एका तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. नंतर त्यांच्यात वाद झाले आणि नेहाने रोहितवर बलात्काराचा आरोप लावला.

इंदूरमध्ये संदीप चौधरीशी तिसरे लग्न –

त्यानंतर नेहाने इंदूरच्या संदीप चौधरीशी लग्न केलं. ती विजयनगर परिसरात राहू लागली. या लग्नात सुरुवातीपासूनच वाद होते. संदीपची आई (नेहाची सासू) आपल्या मुला- सुनेच्या वाढत्या दुराव्याबद्दल चिंतेत होती.

चौथ्या तरुणाशी बोलत होती –

सूत्रांनुसार, नेहा ‘आदर्श’ नावाच्या चौथ्या तरुणाशी फोनवर बोलत होती. सासूने यावर अनेकदा आक्षेप घेतला होता. सासू नेहाला मुलं न होण्याबद्दलही टोमणे मारायची. आता समजलं आहे की, नेहाने पहिल्या मुलानंतर ऑपरेशन करुन घेतले होते, जेणेकरून तिला पुढे मुलं होणार नाहीत. यामुळे ती लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत राहिली. संदीपने काही दिवसांपूर्वी पोलिसांना सांगितलं होतं की, त्याची पत्नी सतत कोणत्या तरी मुलाशी बोलते आणि आत्महत्येची धमकी देते. मुलांबाबत घरात रोज भांडणं होत होती.

सासूला बाथरूममध्ये बोलावलं –

रविवारी रात्री नेहाने आपल्या सासूला बाथरूममध्ये बोलावलं. तिथे तिने तिच्या डोक्यावर जड वस्तूने वार करून तिची हत्या केली. जेव्हा संदीप घरी परतला, तेव्हा त्याला आपल्या आईचा मृतदेह बाथरूममध्ये सापडला. त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नेहा चौधरीला ताब्यात घेतलं आहे. मृतदेह एम.वाय. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस आता नेहाच्या फोन कॉल्स, तिच्या जुन्या संबंधांचा आणि हत्येच्या हेतूचा तपास करत आहेत.

नेहाने केले होते ऑपरेशन –

इंदूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नेहाने पहिल्या मुलानंतर ऑपरेशन करुन घेतलं होतं. जेणेकरून ती लोकांना आपला बळी बनवत राहील. तिने आपल्या सासूला बाथरूममध्ये बोलावलं आणि तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles