🧏♀️🧏♀️ अशी ‘ती’🧏♀️🧏♀️
नववधू म्हणून ती शरमेने लाजली ,
घरच्यांच्या छळण्यान मग शरमच लाजली.
पती परमेश्वर मानून तिने बापाचे घर
सोडले.
किती विश्वासान तिने नवऱ्याशी नाते जोडले.
पती सर्वस्व मानून, ती सतीही गेली,
पुरुषासाठी का नाही हो, अशी रीत केली?
सीतामाता होऊन तिने भोगला वनवास.
पांडवांनी द्रोपदीस खेळात लावले पणास.
सहनशीलता तिच्याकडे, हेच प्रत्येकाच्या मनी,
त्याच मुळे घात होतो, एखाद्या बेसावध क्षणी.
मुकी, बिचारी, अबला बनून सारं ती सोसते,
प्रत्येक आपले कर्तव्य, निमूटपणे पार पाडते.
तरीही हुंड्यासाठी मात्र तीच बळी जाते,
निमित्त मात्र स्टोव्हच्या भडक्याचे होते.!
– कवी – रुजारिओ पिंटो,
मालवण
9422054600


