Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीत ४० पेक्षा जास्त भाविक बेशुद्ध!

पुरी : ओडिशात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी झाल्याने 40 हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पुरी येथील श्री नहर (राजाचा राजवाडा) जवळ झाल्याचे बोलले जात आहे. मात्र या घटनेत अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. चेंगराचेंगरीनंतर अनेक भाविक बेशुद्ध पडले होते. यातील काहींना पुरीच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रथयात्रेतील ‘पहाडी’ सोहळ्यादरम्यान गजपती दिव्य संघदेवाच्या राजवाड्याजवळ लोकांची गर्दी जमली होती. ही गर्दी नियंत्रित करण्यात प्रशासनाला अडचण येत होती. यात गर्दीदरम्यान भाविकांमध्ये गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे भाविकांनी अचानक धावपळ केली, ज्यामुळे काही लोक चेंगरून बेशुद्ध पडले.

भाविकांवर उपचार सुरु –

समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेत 40 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना पुरी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या जखमींच्या उपचाराची योग्य व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, त्यामुळे मोठा अपघात टळला आहे.

2024 मध्येही झाली होती चेंगराचेंगरी –

याआधी 2024 मध्येही पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी गर्दीत गुदमरून एका भाविकाचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी भगवान जगन्नाथाचा रथ पुरीच्या ग्रँड रोडवरून जात असताना ही घडली होती. त्यामुळे अशी घटना टाळण्यासाठी यंदा प्रशासनाने कडक पावले उचलली होती, मात्र तरीही धोका टळू शकला नाही आणि यंदाही चेंगराचेंगरी झाली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles