Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सेवा हाच माझ्या रक्तातला गुणधर्म, तो आजन्म जपणार! : युवा उद्योजक विशाल परब यांचे वेंगुर्ला येथे प्रतिपादन. ; परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप, हॉस्पिटलला वॉशिंग मशीनसह मेडिकल कीट प्रदान.!

वेंगुर्ला : आज वेंगुर्ला येथे विशाल सेवा फाउंडेशन आणि विशाल परब मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम केला. त्याचप्रमाणे रुग्णांचे कपडे तसेच चादरी स्वच्छ करता याव्यात यासाठी ग्रामीण रुग्णालयाला वॉशिंग मशीन सप्रेम भेट म्हणून दिली. यावेळी केतन आजगावकर, प्रशांत नाईक, गणपत राऊळ , अजित नाईक, सचिन शेट्ये, राजू रगजी, श्रीकांत राजाध्यक्ष, दीपेश केरकर, बाबू टेमकर, निलेश मांजरेकर,साईप्रसाद नाईक, राजेश करंगुटकर, प्रसाद शिंदे,संदीप गावडे, विनायक मांजरेकर आदी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

यावेळी युवा उद्योजक विशाल परब यांच्यासह डॉ. गणेश गुट्टे, डॉ. निखिल, इन्चार्ज सिस्टर श्रीमती पी. एफ. डिसोजा तसेच ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना श्री विशाल परब म्हणाले, आयुष्यात चढाव उतार हे यायचेच. परंतु हे जीवन म्हणजे जणू क्रिकेट आहे, थांबला तो हुकला. सेवा हेच संघटन ही शिकवण घेऊन मी माझ्या सामाजिक जीवनात वावरलो. गोरगरिबांची सेवा हाच माझ्या रक्ताचा धर्म असून तो आयुष्यभर जपणार, आता थांबणार नाही. चांगल्या कामात परमेश्वर मला निश्चितपणे बळ देईल असा पूर्ण विश्वास आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशाल परब यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते पुन्हा एकदा समाजसेवेचा वसा घेऊन कार्यरत झाल्याचे चित्र दिसून येत असून सिंधुदुर्गात या स्तुत्य उपक्रमाची चर्चा कौतुकासह सुरू झाली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles