Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

‘सन्मान वारकऱ्यांचा’ सिंधुदुर्ग भाजपचा स्तुत्य उपक्रम वेंगुर्ला येथे भक्तिभावात संपन्न!

– भाजपाच्या वतीने २५ जेष्ठ वारकऱ्यांचा सत्कार.

वेंगुर्ला : वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सामाजिक व आध्यात्मिक जीवनातील अनमोल परंपरा आहे. ‘वारी’ ही श्रद्धा, सेवा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारी चळवळ आहे. ही परंपरा केवळ देवाच्या दर्शनापुरती मर्यादित नसून ती समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे.
याच परंपरेच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टी – सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘सन्मान वारकऱ्यांचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन वेंगुर्ल्यातील चांदेरकर बुवा विठ्ठल मंदिरात करण्यात आले.
सायंकाळी ६ वाजता मंदिराच्या आवारात टाळ-मृदंगाच्या निनादात, “राम कृष्ण हरी” च्या गजरात आणि भगव्या पताका फडकवत वारकऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. वेशभूषा, पादुका, गळ्यातील माळा, डोक्यावर भगवी फेटे, हातात टाळ – असे पारंपरिक वेशात आलेले वारकरी उपस्थित होते.”माऊली माऊली”, “पुंडलीक वरदा हरि विठ्ठल” या घोषणांनी मंदिर परिसर भक्तिभावाने भारला गेला.


या विशेष उपक्रमांतर्गत ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांचा सत्कार जेष्ठ मच्छिमार नेते वसंत तांडेल यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालुन करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गने केवळ राजकीय स्तरावर नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही जबाबदारीने आपले योगदान दिले आहे.या उपक्रमाद्वारे भाजपाने वारकऱ्यांच्या शुद्ध जीवनशैलीला, सेवाभावाला, व समर्पणाला राजकीय नव्हे, तर सामाजिक श्रद्धेने वंदन केले आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई व अँड. सुषमा खानोलकर , तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब ,मा.तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ – श्रेया मयेकर – रसिका मठकर , मा.उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर , युवा मोर्चाचे वैभव होडावडेकर – हेमंत गावडे – मनोहर तांडेल – हितेश धुरी , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , बुथप्रमुख रविंद्र शिरसाठ – प्रमोद गोळम, अरुण ठाकुर , प्रभाकर गावडे , भाऊ केरकर , कृष्णा पेडणेकर इत्यादी
कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या सत्कार प्रसंगी प्रसंन्ना देसाई म्हणाले की, “वारी ही केवळ धार्मिक बाब नाही, तर ती समता, बंधुता आणि श्रममूल्यांची शिकवण देणारी चळवळ आहे. माणसामाणसातील भेदभाव दूर करणारी ही परंपरा महाराष्ट्राचा आत्मा आहे. वारकऱ्यांचा सन्मान करून आपण महाराष्ट्राच्या आत्म्याला नमन करत आहोत.”
या उपक्रमामुळे वारकरी परंपरेचे संवर्धन, नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, आणि सामाजिक ऐक्याचा बळकट विचार रुजवला जाणार आहे. या सत्कारामुळे वारकरी संप्रदायातील मंडळी भारावून गेली .
यावेळी किशोर रेवंणकर , गोविंद परब , दाजी सावंत , अंकुश वराडकर , लता खोबरेकर , प्रमीला टांककर , रजनी वराडकर , शकुंतला कुर्ले , लक्ष्मी तांडेल , जोस्ना कुबल , गुणवंती परब , चंदना कुर्ले , सुप्रीया बांदेकर , दुर्वा कुबल , महेंद्र पालव , लता मसुरकर , केसरी खवणेकर , सहदेव गिरप , सुजाता कुर्ले , विठ्ठल वेंगुर्लेकर, श्रीमती मयेकर , सौ. तांडेल , सौ.गिरप इत्यादी २५ वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला .

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles