वेंगुर्ला : आज शाळा मठ कणकेवाडी मध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रम घेण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख व्हावी,रानभाज्यांचे आपल्या आहारातील महत्व कळावे या दृष्टीने सदर प्रदर्शन भरविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.पालकांच्या मदतीने विविध रानभाज्या प्रदर्शनात मांडल्या. यामध्ये एक पानीभाजी,अळू,पेवा,फागला,भारंगी,सुरणं,टायकाळा, कुरडू,घोटवेल,कुड्याच्या शेंगा,तेरं,अळंबी इत्यादी रानभाज्यांचा समावेश होता.
सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम. जयश्री सकपाळ, नामदेव सावंत, ईशा गावडे, ऋतुजा परब, भगत मॅडम, सावंत मॅडम आदी पालक तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक शिक्षक रामा पोळजी यांनी सर्वांचे स्वागत व प्रस्तावना केली. मुख्याध्यापक वीरधवल परब यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्व सांगितले. महिला पालकांनी भाज्या कशा बनवाव्यात?, त्याची कृती सांगितली. मुलांनी आणलेल्या रानभाज्यांची विक्री करून खऱ्या कमाईचा आनंदही मिळवला. सदर कार्यक्रमासाठी शिक्षक प्रकाश भोई व श्रीम. राजश्री घोरपडे यांनी मेहनत घेतली. शेवटी सर्वांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


