सावंतवाडी : तब्बल दीड कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या पुलावर एका वर्षातच खड्डे पडल्यामुळे नेमळे ग्रामपंचायतीने याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खोत यांनी संबंघित ठेकेदाराकडून दुसऱ्या दिवशीच या पुलावरील खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत केली.

तसेच पाच वर्षापर्यंत या पुलाला काही झाल्यास आपण जबाबदार असल्याचे सांगण्यात आले यावेळी नेमळे सरपंच दीपिका भैरे उपसरपंच सखाराम राऊळ सर्व सदस्य माजी उपसरपंच विक्रम पांगम सुनील मुळीक राजा गवस तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते


