Great Job – पीसीईटी सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे अंतिम वर्षातील १,७२२ विद्यार्थ्यांसाठी तब्बल १,५९३ नोकऱ्या!

पुणे : पिंपरी – चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन ग्रुपच्या पीसीसीओई, पीसीसीओईआर व नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अंतिम वर्षातील १,७२२ विध्यार्थ्यांसाठी आतापर्यंत १,५९३ नोकऱ्या मिळाल्या आहेत. येत्या सहा महिन्यात बरेचसे नोकरी मेळावे होणार आहेत अशी माहिती पीसीईटी, नूतनच्या सेंट्रल प्लेसमेंट सेल चे अधिष्ठाता प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी दिली.

विद्यार्थ्यांची निवड नामांकित अश्या आयटी कंपन्यात झाली आहे. काही कंपन्या व त्यांनी दिलेल्या नोकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे : कॅपजेमिनी (३५६), ॲक्सेंचर (२४३), टेक महिंद्रा (१२८), एलटीआय माईंडट्री (७७), केपीआयटी (६५), कॉग्निझंट (५२) इत्यादी. रोजगाराच्या संधी दिलेल्या काही आयटी प्रॉडक्ट कंपन्या व त्यांनी दिलेले वार्षिक पगार पुढील प्रमाणे : लिंक्डइन (60 लाख), अ‍ॅमेझॉन (४७.८८ लाख), कॉमव्हॉल्ट सिस्टिम्स (३३ लाख), लेमा (३0 लाख) इत्यादी. रोजगाराच्या संधी दिलेल्या काही कोअर मॅन्युफॅक्चरींग कंपन्या : फिलिप्स, महिंद्रा अँड महिंद्रा, डसॉल्ट सिस्टिम्स, टाटा टेक्नॉलॉजीज, ऍटलस कॉप्को, गोदरेज, मिंडा, अल्फा लावल इत्यादी. पीसीईटीचे सेंट्रल प्लेसमेंट सेल दर वर्षी विध्यार्थ्यांना सुमारे ३५० नामांकित कंपन्यांत नोकरीची संधी देते. पीसीईटीचे आतापर्यंतचे सर्वाधिक पॅकेज ६१ लाख (उबेर) आहे.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार श्री. ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव श्री. विठ्ठल काळभोर, खजिनदार श्री. शांताराम गराडे, ट्रस्टी श्री. हर्षवर्धन पाटील, उद्योजक श्री. नरेंद्र लांडगे, उद्योजक श्री. अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. हरीश तिवारी, डॉ. जहागीरदार, डॉ. सपली, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थ्यांनी केले आहे.

पीसीईटी, नूतनच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे डॉ. शितलकुमार रवंदळे, प्रा. संदीप पिल्लेवार, प्रा. दीपक पवार, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. विजय टोपे, प्रा. हीना शर्मा प्रा. डेन्झेटा लोबो, श्री. मंगेश काळभोर सर्व विभागातील ट्रेनिंग प्लेसमेंट चे शिक्षक प्रतिनिधी व २०० हुन अधिक विध्यार्थी प्रतिनिधी यांनी योगदान दिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles