सिंधुदुर्ग : ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत इयत्ता ६ वी मध्ये शिक्षण घेणारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरुखे – कोलगाव नंबर दोन प्रशाळेची विद्यार्थिनी कु. दुर्गा दिनेश जाधव हिने प्रथम क्रमांक पटकाविला. आता तिची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय जुदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो कराटे असोसिएशनची ती विद्यार्थिनी असून गुरुवर्य वसंत जाधव सर यांची नात आणि प्रशिक्षक दिनेश जाधव यांची सुकन्या आहे. दुर्गाच्या या यशाबद्दल प्रशाळेचे मुख्याध्यापक, तसेच सर्व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


