वेंगुर्ला : भारतीय नागरिकांच्या मनात देश भक्तीची भावना निर्माण करण्यासाठी तसेच भारतीय राष्ट्र ध्वजाबद्दल जागृतता निर्माण करण्यासाठी “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात येत असून,आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील श्री माऊली विद्या मंदिरात प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक कुणाल बांदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक चंद्रशेखर जाधव यांनी “हर घर तिरंगा” अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.उपस्थित विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत सादर करून व्यसनमुक्तीपर प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रभारी मुख्याध्यापक जाधव यांनी तिरंगा ध्वजाबाबत , व्यसनमुक्ती बाबत माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी संचालन करून ,देशभक्ती गीत सादर करून ,घोषणा दिल्या.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापक चंद्रशेखर जाधव, सहाय्यक शिक्षक कुणाल बांदेकर, शिक्षिका सुप्रिया पेडणेकर, पपेच्युअल डिसोजा, लिपीक शंकर कर्णेकर, गोविंद चिपकर , प्रशालेचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.


