कणकवली : साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे महाराष्ट्र राज्य ‘ क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ सिंधुदुर्ग’ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णा भाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीचे औचित्य साधून तळागाळातील समाज जीवनाचे प्रबोधन करणाऱ्या समाज सेवकांचा सन्मान करण्यात आला विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनाच्या चळवळीत सातत्यपूर्ण ‘ निष्ठावान आणि प्रेरणादायी कार्य करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना ज्ञान , संस्कार , आणि प्रगतीचा मार्ग मिळाला आहे सामाजिक वप्रबोधनाच्या विविध उपक्रमांद्वारे त्यांनी समाजजागृती घडवून आणली असून ‘ वंचित व शोषित घटकांच्या उन्नतीसाठी ते सदैव कार्यरत राहिले आहे त्यांच्या या अमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांना साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे समाजरत्न पुरस्कार प्रा. रामचंद्र भरांडे, डॉ ताडेराव सर, डॉ हारगिले सर, सुधारक भिंगारदिव, डॉ. सोमनाथ कदम सर, प्राचार्य महालिंगे सर यांच्या हस्ते पी जे कांबळे सर यांना शाल, सन्मान पत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.


