सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री. विशाल प्रभाकर परब यांच्या सौभाग्यवती व सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका विशाल परब यांनी घरोघरी जाऊन गणेशदर्शनाचा दौरा सुरू केला आहे. मागील दहा दिवसांपासून श्री. विशाल परब स्वतः जनमानसात मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. यासोबतच त्यांनी विविध सामाजिक मंडळांच्या गणरायाचे तसेच घरोघरीच्या बाप्पाचे दर्शन घेत स्थानिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

युवा उद्योजक विशाल परब यांच्या राजकीय वाटचालीत त्यांच्या अर्धंगिनी सौ. वेदिका परब यांची नेहमीच खंबीर साथ लाभतांना दिसते. विविध उपक्रमांच्या नियोजनात त्यांचा मोलाचा सहभाग असतो. याच पार्श्वभूमीवर त्यांनी यंदाही गावोगावी भेट देत घरोघरीच्या गणरायाचे दर्शन घेतले आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या आपुलकीच्या गणेशदर्शन दौऱ्यामुळे लोकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या दौऱ्यामुळे सावंतवाडी मतदारसंघात परब दाम्पत्याची राजकीय आणि सामाजिक वाटचाल प्रभावीपणे अधोरेखित होत असल्याचे बोलले जात आहे.


