Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू, आता पत्नी झाली ‘लेफ्टनंट’! ; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी!

कोल्हापूर : संकटावर मात करून धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या कोल्हापूरच्या कन्या प्रियांका खोत यांनी आजचा (दि. 6) दिवस अभिमानास्पद ठरला. चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नेमणूक मिळाली. प्रियांका खोत या दिवंगत नाईक (जवान) निलेश खोत यांच्या पत्नी आहेत. निलेश खोत सिग्नल्स कॉर्प्समध्ये कार्यरत होते. 2022 मध्ये हेडक्वार्टर्समध्ये सेवेत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्याआधीच त्यांनी वडिलांना गमावले होते. या दुहेरी आघाताने खोत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, तरी देखील प्रियांका यांनी भारतीय सैन्यात जात कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेतला.

पतीच्या गमावल्याच्या दुःखात खचून न जाता प्रियांका यांनी आपल्या पतीच्या स्मृतीला जपण्यासाठी सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावची रहिवासी आहे. आज मला ऑर्डनन्समध्ये नियुक्ती मिळाली आहे. हा क्षण माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत खास आहे. पतीच्या निधनानंतर सैन्याकडून मिळालेला आधारच मला या वाटेवर आणणारा ठरला. त्या काळात कुटुंबासाठी उभं राहणं हेच माझं ध्येय बनलं.”

पुढे बोलताना प्रियांका म्हणाल्या, त्यांना ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आम्ही तीन वर्ष सोबत राहत होतो. त्यांनी मला नेहमीच सपोर्ट केला. आर्मी म्हणजे फक्त जॉब किंवा प्रोफेशन नाही, तो जीवनाचा मार्ग आहे.

परमेश्वरन ड्रिल स्क्वेअर येथे झालेल्या या सोहळ्यात प्रियांका खोत यांच्यासह एकूण 130 ऑफिसर कॅडेट्सनी  शॉर्ट सर्व्हिस कमिशनचे प्रशिक्षण पूर्ण केले, ज्यामध्ये 25 महिला सामील होत्या. कोल्हापूरच्या प्रियांकाने मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे.

 

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles