Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

भाजपाच्या ‘त्या’ पदाधिकार्‍याने गाववासियांना खड्डेमय रस्त्याच्या धोक्यातून वाचवले की धोक्यात घातले? ; ‘या’ गावात होतेय चर्चा.

सावंतवाडी : भाजप युवामोर्चा पदाधिकारी याने आरवली सोन्सुरे ग्रामवासियांना गणेश चतुर्थीची आगळी वेगळी भेट म्हणून येथील खड्डेमय रस्त्यावर माती टाकून दिली आहे.  यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात ग्रामस्थाना चिखलातून ये – जा करावी लागत आहे. आरवली सोन्सुरे येथे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून एका भाजपा युवामोर्चा पदाधिकारी याने स्वखर्चाने गावाच्या खराब रस्त्यां करुन देण्याचे आश्वासन दिले. त्या ठिकाणी काँक्रीटीकारण करुन खड्डे बुजवणे आवश्यक होते. मात्र त्या खड्ड्यांमध्ये माती ओतून ते बुझविण्यात आले. यामुळे त्या रस्त्यावर चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे. लोकांना रस्त्यावरून गाडी चालवतो की शेतातून हेच समजेनासे झाले आहे. गाववासियांना खड्डेमय रस्त्याच्या धोक्यातून वाचवले की आणखीन धोक्यात घातले?, अशी चर्चा होत आहे.

दरम्यान, या मातीमुळे गाड्या घसरण होवून अपघात होत असून गावात याची एकच चर्चा सुरु होताच, तातडीने परत जेसीबीच्या साहाय्याने टाकलेली माती बाजूला काढण्यात आली. त्यामुळे पुर्वी होता त्या पेक्षा रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. त्या भाजपा पदाधिकारी यांना ग्राम वासियांना चतुर्थीची आगळी भेट द्यायची होती तर पावसाळी डांबर घालून अथवा काँक्रीटी करण करुन दिले पाहिजे होते . गावातील लोक स्वतः मेहनतीने माती टाकतं होते. चतुर्थी सण जवळ आला की सर्व लोक एकत्र येऊन रस्ता वरील खड्डे बुजवण्याचे काम करायचे . या त्रासापासून मुक्त होण्यासाठी लोकांनी लोक प्रतिनिधीना वारंवार आपले गार्हाणे घातले. वारंवार रस्ता मंजूर झाला अशी आश्वासने मिळत होती. मात्र तसे झाले नाही. लोक प्रतिनिधी यांना जनतेची एवढीच काळजी होती तर या रस्त्यावर सिमेंट कींवा पावसाळी डांबर घालून खड्डे बुजवायला पाहिजे होते. लोकांच्या भावनेशी खेळुन काय साध्य करायचे होते असा सवाल केला आहे. डांबरीकरण येवढे वर्षे रखडलेले का यांचा पाठपुरावा करायला हवा होता.

रस्त्याचे डांबरीकरण कित्येक वर्षे रखडलेले आहे. हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतुन पुर्ण होण्यासाठी पाठपुरावा करुन दीवाळी पुर्वी कामास सुरूवात करावे. तो पणं आरवली नाक्यावरू सुवात करून पुर्ण सोन्सुरा गावात मुख्य रस्ता पुर्ण होण्यासाठी पाठपुरावा केरावा . चिखल मय नको याबद्दल गावातील लोक आभार मानतील असे यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आबा चिपकर यांनी सांगितले आहे.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles