वेंगुर्ला : भाजप महिला मोर्चा, वेंगुर्ला यांच्या वतीने महिलांना ‘लोकल टू व्होकल’ या संकल्पनेनुसार आत्मनिर्भर बनवण्यासाठी मॅट रांगोळी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन चिपळूण येथील उमा फॅशन इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ. उमा म्हाडदळकर यांनी केले. म्हाडदळकर यांनी आतापर्यंत १००० हून अधिक महिलांना स्वावलंबी बनवले आहे. त्यांच्या संस्थेतर्फे फॅशन डिझायनिंगसह विविध लघु व दीर्घ कोर्स घेतले जातात.

सौ. शीला गावडे यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष सौ. सुषमा प्रभूखानोलकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ. वृंदा गवंडळकर, तालुकाध्यक्ष महिला मोर्चा सौ. सुजाता पडवळ, तालुका महिला मोर्चा सरचिटणीस सौ. आकांक्षा परब, चिटणीस सौ. प्रार्थना हळदणकर, माजी नगरसेविका सौ. ईशा मोंडकर, माजी नगरसेविका सौ. साक्षी पेडणेकर तसेच वेंगुर्ला शहरातील अनेक महिला उपस्थित होत्या. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


