वेंगुर्ला : भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहरासाठीचा रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा आज वेंगुर्ले भाजपा कार्यालयात भाजपा युवा नेते श्री विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या उदंड उत्साहात संपन्न झाला. यावेळी विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ल्यातील जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस 20 सप्टेंबर २०२५ रोजी होत आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून सातत्याने कार्यरत राहण्याचा मंत्र रविंद्रदादा चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. आपल्या लाडक्या संघटनानिष्ठ नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रम व कार्यक्रम करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे आणि त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी सेवा उपक्रमातून श्री. चव्हाण यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे.
वेंगुर्ले शहरातील जनतेला येणाऱ्या आकस्मिक आरोग्य अस्वास्थ्याच्या अडचणींचा विचार करता जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा संकल्प भाजपा युवा नेते श्री विशाल परब यांनी केला होता. आज रविंद्रदादा चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या संकल्पाची पूर्ती झाली आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ नेते शरद चव्हाण यांच्या हस्ते वेंगुर्ले शहरासाठीच्या या रुग्णवाहिकेचे अनावरण करत जनतेसाठी लोकार्पण करण्यात आले.
सर्वांचे लाडके नेते असलेल्या रवींद्र चव्हाण यांना अपेक्षित असणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताचे विविध कार्यक्रम राबवत या कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा यथोचित सन्मान आम्हा कार्यकर्त्यांकडून या वाढदिवसाच्या निमित्ताने केला जाईल असे यावेळी श्री विशाल परब म्हणाले. हे अखंड सेवाव्रत असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या रुग्णवाहीका लोकार्पण सोहळ्याप्रसंगी विशाल परब, ॲड. अनिल निरवडेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष पपू परब, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, माजी नगराध्यक्ष मा.राजन गिरप, राज्य परिषद सदस्य गुरुनाथ उर्फ राजू राऊळ, महिला तालुकाध्यक्षा सुजाता पडवळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, ओबीसी सेल अध्यक्ष रमेश नार्वेकर, शरद मेस्त्री, अल्पसंख्याक सेल श्री सायमन आल्मेडा तसेच महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, हसीना बेन मकानदार, रिया केरकर , कृपा मोंडकर, शक्ती केंद्र प्रमुख किरण कुबल, माजी उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, आसोली उपसरपंच संकेत धुरी, म्हापण माजी सरपंच नाथा मडवळ, मठ सोसायटी चेअरमन सुभाष खानोलकर, रवींद्र खानोलकर, नामदेव सरमळकर, पुंडलिक हळदणकर, भानुदास कुबल, श्याम खोबरेकर , विजय रेडकर, समीर कुडाळकर, प्रशांत नाईक, सचिन शेट्ये, गणपत राऊळ यांच्यासह शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, तालुका कार्यकारणी सदस्य,विविध मोर्चा आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


