वेंगुर्ला : ‘श्री देव सिद्धेश्वर नवयुवक मित्र मंडळ’ आयोजित नवरात्र उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल जी परब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवून मंडळाला व उपस्थितांना प्रोत्साहन दिले. यावेळी रेडी उत्सवाच्या या शानदार सोहळ्यात, रेडी गावाचे सरपंच भाई राणे यांच्या हस्ते विशाल परब यांचा शाल-श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी विशाल परब यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक व धार्मिक एकोपा जपल्याबद्दल मंडळाचे आभार मानले.
दरम्यान यावेळी मंडळाचे आबा गोसावी, सावळाराम गोसावी, सिद्धेश गोसावी, भजरवीर गोसावी, प्रभाकर मामलेकर, किसन मामलेकर, रोहित गवंडी, अजित पडवळ, प्रशांत गवंडी, प्रीतम मामलेकर, सागर परब, सागर राणे यांसारखे मान्यवर आणि असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.


