मुंबई : कलाविश्वात अनेक असे स्टार्स आहेत, ज्यांनी शानौ-शौकत सोडून, ग्लॅमरस दुनियेला अलविदा म्हणत संन्यास घेतला आहे. अगदी यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना त्यांनी झगमगत्या दुनियेचा त्याग करत, अगदी साधं-सुधं आयुष्य स्विकारलं आणि कॅमेऱ्यापासून स्वतःला दूर केलं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबाबत सांगणार आहोत. जिनं एकेकाळी आपल्या अभिनयाच्या जादुनं टेलिव्हिजनच्या पडद्यावर राज्य केलं. लोक तिच्या अभिनयावर, तिच्या सौंदर्यावर मोहित झालेले, पण तिनं एक दमदार कारकीर्द मागे सोडली आणि संन्यास घेतला. तब्बल तीन वर्ष झाली, ही अभिनेत्री वैराग्याचं आयुष्य जगतेय. आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, तिचं नाव नुपूर अलंकार.
तीन वर्षांपूर्वीच सोडला अभिनय –
कधीकाळी टेलिव्हिजनच्या पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेत्री नुपूर अलंकारला आज कदाचितच कुणी ओळखत असेल. नुपूरनं आपल्या टेलिव्हिजनवरच्या करिअरमध्ये 157 शो केले. प्रत्येक शोमध्ये तिचं काम उल्लेखनिय होतं. त्यावेळी ती टेलिव्हिजनच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. पण, अचानक तिनं इंडस्ट्री सोडली आणि संन्यास घेतला. तिनं इंडस्ट्री सोडली आणि चाहत्यांसह तिचे फॅन्सही हैराण झालेले. 2022 मध्ये नुपूरनं अभिनयातून काढता पाय घेतलेला. इंडस्ट्री सोडण्यासोबतच नुपूरनं आपल्या वैवाहित आयुष्याचा त्याग केलेला. तिनं लग्नाच्या 20 वर्षांनी आपल्या पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि आज नुपूर आपला संपूर्ण दिवस देवाचं नाव घेण्यात घालवते.
भिक्षा मागून भरतेय पोट –
संन्यासी बनल्यानंतर नुपूरनं भिक्षा मागून खाणं सुरू केलं. अभिनेत्रीचं म्हणणं आहे की, जर भिक्षा मागून खाल्लं नाहीतर, मी संन्यासी कसली? नुपूरनं भिक्षा मागतानाचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केलेले. या फोटोंमधून पाहायला मिळतंय की, अभिनेत्रीला तब्बल सहा लोकांनी भिक्षा दिलेली आणि तो तिच्या भिक्षा मागण्याचा पहिला दिवस होता. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, ‘दीया और बाती हम’, ‘शक्तिमान’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’, ‘सांवरिया’ आणि ‘राजाजी’ यांसारख्या प्रसिद्ध शोमध्ये काम केलेलं आहे. अभिनयाच्या जगात तिनं 27 वर्ष घालवली आणि त्यानंतर इंडस्ट्री सोडून संन्सास घेतला.


