Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

देवगड मोर्वे येथे विठ्ठल रखुमाई मंदिरात शताब्दी महोत्सव हरिनाम सप्ताहाची शंभर वर्षे ; भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.

भाविकांनी मोठ्या संख्येने व्हावे सहभागी- श्री पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ भंडारी समाज मोर्वे यांचे आवाहन

देवगड : देवगड तालुक्यातील मोर्वे येथील श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिरात होणारा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहचा शतक महोत्सव यावर्षी साजरा होत असून यानिमित्त ४ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे, या धार्मिक सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री.पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ भंडारी समाज मोर्वे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

४ नोव्हेंबर रोजी सत्यनारायण महापूजा
आणि कीर्तन सोहळा संपन्न झाला,५ नोव्हेंबर रोजी श्री देव काळभैरव मंदिर हिंदळे ते श्री देव विठ्ठल रखुमाई मोर्वे मंदिरपर्यंत पर्यंत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली,दिव्यजोत समई नृत्य ग्रुप आचरा डोंगर वाडी यांचा कार्यक्रम पार पडला,
६ नोव्हेंबर रोजी
सकाळी हरिनाम सप्ताह प्रारंभ, रात्री १० वाजता
आचरा वरची चावडी वाडी यांची वारकरी दिंडी,
७ नोव्हेंबर रोजी आई भगवती कला दिंडी भजन मंडळ, तोरसोळे यांची वारकरी दिंडी.
८ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी कला दिंडी भजन मंडळ इळये सडा यांची दिंडी,
९ नोव्हेंबर रोजी पावणाई मंदिर प्रासादिक भजन मंडळ किंजवडे यांची दिंडी.
१० नोव्हेंबर रोजी गोवा येथील (घुमाट) कार्यक्रम,
११ नोव्हेंबर रोजी माऊली वारकरी दिंडी मोर्वे,
१२ नोव्हेंबर रोजी श्री पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ भंडारी समाज यांची भव्य दिंडी, ढोल पथक, भजन. आदी कार्यक्रम रोज रात्री १० वाजता होणार असून या धार्मिक सोहळ्यात सर्व भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे,

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles