Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

ॲड. किशोर वरक यांच्यावरील खंडणीच्या गुन्हा प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक! ; कुडाळ पोलिसांवर आक्षेप, तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यामार्फत व्हावा! : जिल्हाध्यक्ष बाबुराव धुरी यांचे पोलीस अधीक्षक यांना पत्र.

कुडाळ : ॲड. किशोर वरक यांच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या कथित खंडणीच्या गुन्हा प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असून सदर प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याबाबत जिल्हाध्यक्ष बाबुराव धुरी यांनी पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग यांना दिलेल्या पत्रात ॲड. किशोर वरकसह अन्य एकावर कुडाळ पोलीस ठाणे येथे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सिद्धेश शिरसाठ याच्याकडून खंडणी मागणी केल्या प्रकरणी खोटी फिर्याद देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी निवती पोलीस स्टेशन येथे सुद्धा सिद्धेश गावडे या व्यक्तीने ॲड. किशोर वरक यांच्या विरुद्ध असाच खोटा अपहरणाचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला होता.आता ती फिर्याद खोटी ठरली आहे.. म्हणूनच बहुदा ॲड. वरक हे खोट्या गुन्ह्यात अडकले नाहीत म्हणून या खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आमचे स्पष्ट मत असून विशेष म्हणजे ॲड. किशोर वरक यांनी निवती पोलीस स्टेशन येथील कथीत अपहरण मारहाण गुन्हामागे सिद्धेश शिरसाठ आणि काही भ्रष्ट पोलिसांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. म्हणजे किशोर वरक यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्याच सिद्धेश शिरसाठ याचा पत्नीने कुडाळ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे.
तसेच ज्या वादग्रस्त पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचावर ॲड. किशोर वरक यांनी आरोप केले होते आणि त्याबाबत महिला आयोगाने आपल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून चौकशी अहवाल मागवला त्याच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असणारे राजेंद्र मगदूम हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्यामुळे हे प्रकरण पूर्णपणे संशयास्पद वाटत आहे.
ॲड. किशोर वरक यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यावर केलेले आरोप गंभीर होते. त्यामुळेच ॲड. किशोर वरक यांना राजेंद्र मगदूम आणि सिद्धेश शिरसाठ यांनी अडकविण्यासाठी हे षडयंत्र रचले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे
वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून निःपक्ष तपास होणे गरजेचे.
सदर प्रकरणी ॲड. किशोर वरक यांच्यावरील या कथित गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडून होणे गरजेचा आहे कारण वादग्रस्त पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या कडून ॲड. किशोर वरक यांच्या वर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे.
ॲड. किशोर वरक यांनीच सिद्धिविनायक बिडवलकर हत्या प्रकरण शोधून काढले आणि सर्व पुरावे पोलिसांना दिले होते. त्यामुळे फिर्यादी चा पति आणि अन्य ५ आरोपी हा ४ महिने तुरुंगात राहिले होते. ॲड. किशोर वरक आणि बिडवलकर , चव्हाण कुटुंबियांनी पहिल्या पासूनच सिद्धेश शिरसाठ यांचावर मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आपल्याकडे केली होती. त्यामुळे मकोका न लावण्यासाठी खंडणी मागणे हे पटण्यासारखे नाही. तसेच मकोका चा प्रस्ताव पोलिसांनी वरिष्ठ कार्यालयात पाठवायचा असतो. त्यामुळे ॲड. किशोर वरक यांनी मकोका ची मागणी करून खंडणी वसूल केली हे पटण्यासारखे वाटत नाही.
ॲड किशोर वरक यांनी यापूर्वी सदर सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणात तपास अधिकारी आणि कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी काही साक्षीदारावर दबाव टाकला होता. त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले नाहीत असा आरोप ॲड . वरक केला होता . त्याचा राग मनात धरून हा खोटा गुन्हा नोंदवण्यात आला आहे का? याचा तपास होणे गरजेचे आहे.

FIR ४ महिने उशिराने का?

ॲड किशोर वरक यांच्या विरुद्ध सिद्धी शिरसाठ हिने दिलेली तक्रार ४ महिने ११ दिवस उशिराने केली आहे.. वास्तविक ॲड. किशोर वरक यांनी खरच खंडणी मागितली होती किंवा खंडणी घेतली तर एवढे महिने का तक्रार दिली नाही? आताच तक्रार देण्या मागील खर कारण काय?
ॲड. किशोर वरक यांनी ज्यांचा मार्फत खंडणी मागितल्याचे सांगितले जाते तो सुरेश झोरे हा शिंदे शिवसेनेचा ओबीसी जिल्हाप्रमुख आहे, तर फिर्यादी सिद्धी शिरसाठ ही शिंदे शिवसेनेची माजी महिला तालुका प्रमुख आहे, ज्याने पैसे दिले असे सांगत आहेत तो तुळसकर हा शिंदे सेनेचा माजी तालुका प्रमुख आहे तर हार्दिक शिगले हा नितेश राणे यांच्या जवळचा भाजपचा कार्यकर्ता आहे. ही सर्व सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत. आणि अँड. किशोर वरक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि ते पक्षाचे वकील पण आहेत. त्यांनी सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरण उघडकीस आणले तसेच दीक्षा बागवे हिच्या खून प्रकरणात महिला आयोग यांचा मार्फत चौकशी लावली त्यामुळेच त्यांना अडकवले जात आहे का ? याचा तपास होणे गरजेचे आहे
सदर खोट्या खंडणीचा तपास कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे करत असून त्यांची कारकीर्द वादग्रस्त आहे. त्यांच्यावरच नागपूर येथे सन २०१७ मध्ये बलात्काराची, मारहाण आणि धमकीचा गुन्हा होता. तसेच अल्पवयीन मुलीच्या अपहरणाबाबत गुन्हा नोंद न केल्याने बार्शी येथील न्यायालयाने राजेंद्र मगदूम यांना समन्स जारी केला होता, दीक्षा बागवे खून प्रकरणी त्यांच्या तपासाबाबत महिला आयोगाने अहवाल मागवला आहे. तसेच घावनळे ( कुडाळ) येथील विवाहित स्त्री वर झालेल्या बलात्कार प्रकरणात गुन्हा नोंद न केल्याने धनगर समाज आक्रमक झाला होता. नंतर शून्य नंबर ने वेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार गुन्हा नोंद करण्यात आली होता त्याच प्रमाणे सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणात अपहरणाच्या प्रत्यक्ष साक्षीदारावर दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अशा वादग्रस्त अधिकाऱ्याने ज्याच्या विरुद्ध ॲड. किशोर वरक यांनी अगोदरच तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याच्याकडून निःपक्ष तपास होणार नाही. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव धुरी यांनी केली आहे.
तसेच सदर खोट्या गुन्ह्यात ॲड. किशोर वरक यांना अटक करण्यात आल्यास पुढे कोणताही वकील लोकांना न्याय देण्यासाठी पुढे येणार नाही.
त्यामुळे वरील सर्व मुद्यांचा विचार करून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडे द्यावा अशी मागणी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles