सावंतवाडी : येथील प्रभाग क्रमांक ५ मधील भाजपाचे उमेदवार सुधीर आडिवरेकर यांनी आज नरसोबा मंदिरात श्रीफळ वाढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. या प्रसंगी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले तसेच महिला नगरसेवक पदाचे उमेदवार दुलारी रांगणेकर यांनीही प्रचाराला प्रारंभ केला.
दरम्यान आमचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील, विरोधक फक्त टीका करत बघत राहतील, असा आशावाद सुधीर आडिवरेकर यांनी व्यक्त केला.


