– भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत गांधी चौकात होणाऱ्या भाजपाच्या भव्य प्रचारसभेचे सावंतवाडी शहराला औत्सुक्य!
सावंतवाडी : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ आता रंगतदार टप्प्यावर आली आहे. सावंतवाडीच्या राजघराण्याच्या सुनबाई असणाऱ्या सौ. श्रद्धाराजे लखम सावंत-भोसले यांना भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी संधी देण्याचा निर्णय घेतला आणि निवडणुकीच्या कहाणीत ट्विस्ट आला. ही निवडणूक सावंतवाडीकर जनतेच्या भावनेशी थेट जोडली गेली. कारण सावंतवाडीच्या राजघराण्याचे आणि जनतेचे अनेक वर्षे घट्ट ऋणानुबंध आहेत. एक विश्वासाचे नाते आहे. त्यातही अमेरिकेत शिक्षण घेतलेल्या सौ श्रद्धाराजे उच्चविद्याविभुषित आहेत. त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर सावंतवाडी शहर व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन याचा विचार करून एक विकसित मॉडेल बनवण्याचा संकल्प केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि पालकमंत्री नितेशजी राणे यांनीही जिद्दीला पेटत एक विकसित शहर म्हणून सावंतवाडीला नावारुपाला आणण्याचा निर्धार केला आहे. निसर्गसंपन्न, ऐतिहासिक व सांस्कृतीक सावंतवाडी शहराचा पर्यटन, पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाचा हा नियोजित विकासाचा “महासंकल्प” जनतेसमोर सादर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने ही ‘जाहिर सभा’ आयोजित केली आहे.
आज मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी
वेळ : सकाळी १० वाजता गांधी चौक, सावंतवाडी येथे ही सभा संपन्न होणार आहे.
या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सावंतवाडीच्या शाश्वत विकासाच्या आराखड्याला आपला सर्वांचा पाठिंबा द्यावा असे आवाहन भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते श्री विशाल परब यांनी केले आहे.
सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ श्रध्दाराजे सावंत भोसले व सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार यावेळी जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी या सभेला उपस्थित राहणार आहेत. भाजपाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा आणि सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाचे “कमळ फुलवा” असे विनम्र आवाहन श्री विशाल परब यांनी केले आहे.


