Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

खाडीत सुटकेस, सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह! ; भयानक मर्डरमुळे एकचं खळबळ!

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात खुनाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी तर महिलांचा, अल्पवयीन मुलीचा निर्घृनपणे खून करण्यात आलाय. हीच बाब लक्षात घेऊन राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, असे म्हणत राज्यातील पोलीस नेमकं काय करत आहेत, असा सवाल उपस्थित केला जातोय. असे असतानाच आता राज्यात खळबळ उवडून देणारी एक मोठी घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शीळ रोवर एका तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला आहे.

देसाई खाडीत एकच खळबळ –

मिळालेल्या माहितीनुसार कल्याणच्या शीळ रोडवर एका सुटकेसमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला आहे. देसाई खाडी परिसरात हा मृतदेह आढळला आहे. ही घटना समोर आल्यानंतर देसाई खाडीत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह सापडलेल्या तरुणीचे वय 28 ते 30 वर्षे आहे. तिची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये फरून फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत्यू झालेली तरुणी नेमकी कोण?

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला आहे. तसेच फॉरेन्सिक टिमकडून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. डाकघर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यू झालेली ही तरुणी नेमकी कोण आहे? हे अद्याप समजू शकलेले नाही. शवविच्छेदनानंतर तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकते. तसेच ही तरुणी नेमकी कोण आहे, हे शोधण्याचेही आव्हान आता पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

पोलीस आरोपीचा शोध कसा घेणार?

या प्रकरणात मृत्यू झालेली तरुणी ही नेमकी कोण आहे हेच माहिती नसल्यामुळे आरोपीचा शोध तरी कसा घ्यावा? असे कोडे पोलिसांना पडले आहे. पोलीस सध्या खाडी परिसराची तपासणी करत आहेत. तसेच भविष्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर काही तांत्रिक बाबींची मदत घेऊन पोलीस आरोपीला शोधण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. भविष्यात या प्रकरणात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles